परत येत आहे का PUBG, या कंपनीसोबत होता आहे भागेदारीची बोलणी

भारतात लाखो गेमर्सचा सर्वात आवडता बॅटल रॉयल गेम PUBG Mobile ला भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी चायनीज कनेक्शन असल्यामुळे बॅन केले होते. त्यानंतर भारतात या गेमचा कमबॅक आणि बॅन कायम राहण्याच्या बातम्यांचा ओघ चालूच आहे. काही रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी Tencent सह पार्टनरशिप तोडल्यानंतर भारतात गेमर्ससाठी PUBG येईल. तसेच एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि भारताची मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स पॉप्युलर गेमच्या वापसीचे संकेत देत नाही, ज्याचा अर्थ असा कि PUBG Mobile वर भारतात बॅन कायम राहील. पण पुन्हा एकदा रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि हा गेम भारतात कमबॅक करण्यासाठी एयरटेलशी बोलणी करत आहे.

एयरटेलशी बोलणी सुरु आहे

Entrackr वेबसाइटच्या रिपोर्टनुसार PUBG भारतात कमबॅक करण्यासाठी टेलीकॉम कंपनी भारती एयरटेलशी बोलणी करत आहे. जर पबजी आणि एयरटेलची डील झाली तर यामुळे एयरटेलकडे पबजी मोबाईलच्या वितरणाचा अधिकार येईल. रिपोर्टनुसार या बोलणीला सुरवात झाली आहे. दुसरीकडे गेमिंग प्लॅटफॉर्म भारतात एक आपली टीम वाढवण्यात पण व्यस्त आहे. कंपनी 4 ते 6 वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांचे इंटरव्यू घेत आहे. याआधी PUBG Mobile Jio सह पार्टनरशिप करणार असल्याची बातमी The Hindu BusinessLine च्या रिपोर्ट मधून आली होती.

काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि दोन्ही कंपन्यांची बोलणी सुरु आहे आणि Jio सोबत मिळून PUBG भारतात गेम वापस आणण्याचा प्रयत्न करत आहे. बोलले जात आहे कि PUBG चे अनेक लॉन्ग-टर्म प्लान्स भारताशी संबंधित आहेत, त्यामुळे कंपनी दमदार लोकल पार्टनर शोधत आहे. आतापर्यंत गेम डिस्ट्रिब्यूशनसाठी PUBG ने चिनी कंपनी Tencent सह पार्टनरशिप केली होती.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here