Realme 10 4G स्मार्टफोन कालच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. रियलमी 10 4जी फोनमध्ये 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. रियलमी 10 4जी लाँचनंतर आता कंपनीच्या Realme 10 5G फोनची माहिती देखील समोर आली आहे. रियलमी 10 5जी स्मार्टफोन 17 नोव्हेंबरला लाँच होणार आहे, आता हा रियलमी मोबाइल बाजारात येण्याआधीच रियलमी 10 5जीचे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइस समोर आली आहे.
Realme 10 5G चे लीक स्पेसीफिक्सशन
रियलमी 10 5जीचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता सर्टिफिकेशन्स साइट टेना व अन्य लीक्समधून समजलं आहे की हा मोबाइल फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनलेली असू शकते जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. हे देखील वाचा: आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु

Realme 10 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो 700 चिपसेट असल्याचा खुलासा टेना लिस्टिंगमध्ये झाला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआयवर चालू शकतो, हे देखील समजलं आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम दिली जाईल जोडीला डायनॉमिक रॅम म्हणजे व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. रियलमी 10 5जी फोन 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो.
फोटोग्राफीसाठी Realme 10 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या माहितीनुसार या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल, सोबत 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर तसेच अजून लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 10 5जीच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.

Realme 10 5G फोनमध्ये ड्युअल सिम, 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात. सिक्योरिटीसाठी या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअपसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये कोणती फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल हे मात्र स्पष्ट झालं नाही. आशा आहे की 33वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: Mirzapur Season 3 रिलीज डेट, ट्रेलर आणि स्ट्रीमिंग टाइम; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Realme 10 5G ची लीक किंमत
रियलमी 10 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 1399 युआन म्हणजे जवळपास 15,600 रुपये असू शकते. लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की Realme 10 5G 8 GB RAM + 256 GB storage व्हेरिएंट 1599 युआनमध्ये लाँच होऊ शकतो ज्याची किंमत इंडियन करंसीनुसार 17,800 रुपयांच्या आसपास असू शकते.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.














