Realme 11 Pro+ 5G च्या लाँचपूर्वीच समोर आली डिजाइन; कर्व्ड डिस्प्ले आणि 200MP कॅमेऱ्यासह करेल दणक्यात एंट्री

Highlights

  • Realme 11 सीरीज चीनमध्ये 10 मेला होईल लाँच
  • लाँचपूर्वीच Realme 11 Pro Plus 5G ची डिजाइन टीज करण्यात आली
  • रियलमीच्या नंबर सीरीजचा हा टॉप-एन्ड स्मार्टफोन नवीन डिजाइनसह होईल लाँच

Realme 11 सीरीजचे फोन चीनमध्ये 10 मेला लाँच होणार आहेत. कंपनीनं लाँच डेटची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर रियलमी 11 प्रो प्लसवरील पडदा देखील हटवला आहे. परंतु लीकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये Realme 11 Pro Plus 5G सह 11 Pro 5G देखील लाँच केला जाऊ शकतो. रियलमीनं लेटेस्ट टीजर शेयर केला आहे ज्यात आगामी रियलमी 11 प्रो+ 5जीची डिजाइन अधिकृतपणे समोर आली आहे.

रियलमी 11 प्रो प्लस 5जी ची डिजाइन

वरील प्रमोशनल पोस्टर्समध्ये तुम्ही पाहू शकता, रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये रिंग आकाराचा कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात तीन कॅमेरा सेन्सर आणि एक LED फ्लॅश देण्यात आला आहे. रियलमीच्या डिजाइन स्टाइलपेक्षा हा फोन पूर्णपणे वेगळा आहे. हे देखील वाचा: आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच

कॅमेरा रिंगवरून समजलं आहे की आगामी Realme 11 Pro+ 5G मध्ये OIS सपोर्टसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. या फोनच्या रियर पॅनलवर चामड्यासारखी फिनिश मिळेल, ज्यात शिलाई कॅमेरा मॉड्यूल पासून खालपर्यंत जाते.

या फोनच्या डावीकडे वॉल्यूम रॉकरसह पावर बटन मिळत आहे. तर टॉपला मायक्रोफोन आणि आयआर ब्लास्टर (ऑफिशियल नाही) दिला जाऊ शकतो. या फोनच्या चारही बाजूला अँटीना लाइनिंग दिसत नाही त्यामुळे असं म्हटलं जात आहे रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये मेटल चॅसीस नसतील.

रियलमी 11 प्रो+ 5जी स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कर्व एज डिस्प्ले मिळू शकतो.

प्रोसेसर : रियलमीच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोर Dimensity 7000-सीरीजचा प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

रॅम आणि स्टोरेज : अपकमिंग Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये लिक्सनुसार 12GB पर्यंत रॅम आणि आणि 1TB पर्यंतची ऑनबोर्ड स्टोरेज दिली जाऊ शकते.

ऑपरेटिंग सिस्टम : Realme 11 सीरीजचे स्मार्टफोन लेटेस्ट Android 13-वर आधारित कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेस Realme UI 4.0 वर चालतात.

कॅमेरा : रियलमीच्या या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा असेल, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाईल. हा 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे

बॅटरी : Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन बाबत बोलले जात आहे की यात 5,000mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here