Realme 12 Lite 4G फोन 8GB रॅम, 108MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरीसह झाला जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत

रियलमीने आपल्या नंबर सीरिज 12 मध्ये एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे. ज्याला Realme 12 Lite 4G नावाने Türkiye मध्ये लाँच करण्यात आले आहे. डिव्हाईसमध्ये युजर्सना 6.72 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर, 108 मेगापिक्सल कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे मोबाईलचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Realme 12 Lite 4G चे स्पेसिफिकेशन

6.72 इंचाचा डिस्प्ले

90Hz रिफ्रेश रेट

स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर

8GB रॅम +256 स्टोरेज

108 मेगापिक्सल कॅमेरा

5000mAh बॅटरी

33 वॉट फास्ट चार्जिंग

  • डिस्प्ले: Realme 12 Lite 4G फोनमध्ये कंपनीने 6.72 इंचाचा मोठा डिस्प्ले प्रदान केला आहे. ज्यावर 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट सादर करण्यात आली आहे.
  • प्रोसेसर: डिव्हाईसचा प्रोसेसर पाहता ब्रँडने परफॉर्मननुसार या स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसरचा वापर केला आहे. जो गेमिंगसह इतर ऑपरेशनमध्ये चांगली अनुभव देईल.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये युजर्सना 8GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जात आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता Realme 12 Lite स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅशसह आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक इतर लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: फोनला चालवण्यासाठी यात 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते, याला फास्ट चार्ज करण्यासाठी 33 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
  • इतर: इतर फिचर्स पाहता Realme 12 Lite 4G मध्ये ड्युअल सिम 4G, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे मूलभूत पर्याय मिळत आहेत.

Realme 12 Lite 4G ची किंमत

  • फोनला तुर्कीमध्ये दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये एंट्री मिळाली आहे. ज्यात 6GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम +256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
  • डिव्हाईसच्या 6GB रॅम +128GB व्हेरिएंटची किंमत TRY 10,999 म्हणजे जवळपास 28,000 रुपये आहे.
  • मोबाईलची 8GB रॅम + 256 जीबी स्टोरेज TRY14,999 म्हणजे भारताच्या किंमतीनुसार जवळपास 38,000 रुपयांचा आहे.
  • Realme 12 Lite 4G स्मार्टफोन Oasis Sun आणि Black सारख्या दोन कलरमध्ये सादर झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here