Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले

Highlights

  • Realme GT Neo 5 चीनमध्ये लाँच झाला आहे.
  • हा Snapdragon 7 Plus Gen 2 वर चालतो.
  • रियलमी मोबाइलमध्ये 100W Charging देण्यात आली आहे.

Realme GT Neo 5 SE आज चीनमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल 240W Charging असेलल्या Realme GT Neo 5 स्मार्टफोनचा छोटा व्हर्जन आहे जो 100W Fast Charging टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये आला आहे. रियलमी जीटी नियो 5 एसई फोनमध्ये 1.5K Display, 64MP Camera, 16GB RAM, Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर 5,500mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी जीटी नियो 5 एसईची किंमत

Realme GT Neo 5 SE चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत CNY 1999 म्हणजे जवळपास 24,000 रुपये आहे. तर फोनचा 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 2199 (जवळपास 26,300 रुपये) आणि 12जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 2299 (जवळपास 27,500 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे.

रियलमी जीटी नियो 5 एसई 5जी फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट 16जीबी रॅमसह 1टीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत CNY 2599 आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 31,100 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये हा रियलमी मोबाइल Final Fantasy आणि Shadow Black कलरमध्ये आला आहे. हे देखील वाचा: अधिकृतपणे समोर आले Redmi Note 12 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स; मिळेल 108MP चा कॅमेरा

रियलमी जीटी नियो 5 एसईचे स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 5 SE स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोन डिस्प्लेमध्ये 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 2160पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 1400निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स मिळतात. कंपनीनं आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे.

रियलमी जीटी नियो 5 एसई लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.91गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 725 जीपीयू आहे. हा रियलमी मोबाइल 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 1टीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: मोबाइल फोन आणि कंप्यूटरमध्ये मराठीत कसं लिहायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

फोटोग्राफीसाठी Realme GT Neo 5 SE च्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here