Realme 12+ 5G फोनचे भारतातीला लाँच झाले कंफर्म, पाहा टीजर आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • रियलमीने एक नवीन फोनचा टीजर शेअर केला आहे.
  • हा Realme 12+ 5G लाँच होणार असल्याचे जवळपास कंफर्म झाले आहे.
  • यात 12 जीबी रॅम +256 जीबीचा सपोर्ट पण मिळू शकतो.


रियलमीने आज मलेशियामध्ये Realme 12+ 5G आणि 12 Pro+ 5G स्मार्टफोनच्या लाँचच्या तारखेची घोषणा केली आहे. तसेच, आता काही दिवसानंतर भारतात नवीन स्मार्टफोनला टीज करण्यात आले आहे. परंतु टीजरमध्ये फोनचे नाव नाही, हा Realme 12 Plus 5G असेल हे जवळपास कंफर्म आहे. अपेक्षा आहे की डिवाइसला 29 फेब्रुवारीला एंट्री मिळू शकते. भारतात याआधी 12 प्रो सीरीज अंतर्गत Realme 12 Pro 5G आणि प्रो प्लस पहिले आला आहे. तर चला, पुढे नवीन फोनची माहिती जाणून घेऊया.

Realme 12+ 5G भारताताली लाँच टीजर

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर रियलमीने फोनचा एक नवीन टीजर शेअर केला आहे.
  • आपल्या एक्स पोस्टमध्ये ब्रँड नं हॅशटॅग #OneMorePlus लिहिले आहे ज्याचा अर्थ असा आहे की नवीन डिवाइस Realme 12+ 5G असणार आहे.
  • हे पण सांगण्यात आले आहे की कंपनी आगामी मोबाइलला मिड-रेंजमध्ये घेऊन येईल.
  • कंपनी वेबसाइटवर पण फोनची मायक्रोसाइट लाइव्ह करण्यात आली आहे. ज्यात याची झलक ग्रीन कलरमध्ये समोर आली आहे. हा लेदर फिनिश आणि वर्टिकल स्ट्रैप मध्ये दिसला आहे.
  • कंपनीचा दावा आहे की फोनमध्ये 12 नवीन अपग्रेडची सुविधा मिळेल.
  • जाणून घेऊया की Realme 12+ 5G चे मलेशियामध्ये लाँच 29 फेब्रुवारीला कंफर्म आहे. असे वाटत आहे की भारतात पण या दिवशी हा मोबाइल येऊ शकतो.

Realme 12+ 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Realme 12+ 5G मध्ये युजर्सना 6.67 इंचाचा फ्लॅट अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन मिळू शकते.
  • प्रोसेसर: फोनचा प्रोसेसर पाहता यात परफॉर्मन्ससाठी ब्रँड मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 चिपसेटचा उपयोग केला आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाइसमध्ये युजर्सना 12जीबी पर्यंत रॅम आणि 256जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची चर्चा आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायजेशनला सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर लावला जाऊ शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
  • बॅटरी: फोनमध्ये युजर्सना 5000mAh ची जास्त वेळ चालणारी बॅटरी आणि 67 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Realme 12+ 5G लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here