घोडेस्वार Swiggy डिलिव्हरी बॉयला शोधा आणि मिळवा मोठं बक्षीस; कंपनीनं केली घोषणा

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे महानगरातील अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना ऑफिसमध्ये जाण्यासाठी तसेच दैनंदिन कामं करण्यासाठी अडचण येत आहे. अशात एका Swiggy डिलिव्हरी बॉयनं हटके मगर शोधून काढला होता. पावसाच्या संतत धारेला न जुमानत या पठ्ठ्यानं घोड्यावर स्वार होऊन फूड डिलिव्हरीसाठी निघाला. सोशल मीडीयावर याचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन डिलीव्हरी करताना दिसत आहे आणि आता स्वीगी कंपनी या व्यक्तीला शोधत आहे.

अलीकडेच मुंबईच्या पावसात घोडयावर स्वार झालेल्या एका डिलिव्हरी मॅनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऑनलाइन फूड-डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीनं युजर्सना त्या व्यक्तीची ओळख पटवून देण्यास मदत करण्याचं आवाहन केलं आहे. इतकेच नव्हे तर आवश्यक ती माहिती देणाऱ्या पहिल्या व्यक्तीला Swiggy मनीमध्ये 5 हजार रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ट्विटरवरून कंपनीनं ही घोषणा करताना म्हटलं आहे की, कंपनीनं एक स्विगी-वाईड हॉर्स-हंट सुरु केली आहे. हे देखील वाचा: नादच खुळा! 11 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरी Tecno Spark 8P लाँच

कंपनीनं म्हटलं आहे की, “इतर सर्व ऑप्शन संपल्यावर, आम्हाला आता या गोष्टीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आम्ही आधीच एक स्विगी-वाईड हॉर्स-हंट सुरु केली आहे आणि एक बक्षीस देखील जाहीर केलं आहे.” पुढे सांगण्यात आलं आहे की, “पहिल्या व्यक्तीसाठी Swiggy Money मध्ये 5 हजार रुपये देण्यात येतील जो आम्हाला आमच्या ब्रँड अम्बॅसेडरबाबत काही महत्वाची माहिती देऊ शकेल. आम्हाला त्यांचे आभार मानायचे आहेत.”

काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमध्ये एक अनोळखी व्यक्ती सफेद घोडयावर बसून Swiggy मोनोग्राम असलेली डिलिव्हरी बॅग सोबत घेऊन जात असल्याचं दिसलं आहे. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की त्यांनी आपली सामान्य डिलिव्हरी वाहन बदलली नाहीत. पुढे कंपनीनं स्वीगीनं म्हटलं आहे की जास्त पर्यावरण अनुकूल डिलिव्हरी सिस्टम शोधत असताना आमच्या नॉर्मल डिलिव्हरी सिस्टमची जागा घोडे, खच्चर, गाढव, उंट आणि हत्तींनी घेतली नाही. कंपनीनं सांगतील आहे की, “तुम्ही रायडर आणि त्याच्या घोड्याच्या सन्मानार्थ आम्ही देत असलेले छोटे रिवार्ड्ज ट्रॅक करण्यासाठी अ‍ॅपवर देखील जाऊ शकता.” हे देखील वाचा: चिनी कंपन्यांना म्हणाल बाय-बाय! 8699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला LAVA Blaze लाँच, Earbuds Free

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

जेव्हा हा डिलिव्हरी बॉय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा एजंट असल्याचं समजलं तेव्हा नेटिझन्सनी त्याला उचलून धरलं. नेटिझन्स स्विगी डिलिव्हरी एजंटच्या या स्टाइलचे कौतुक करत होते. कामासाठी असलेल्या कमिटमेंट कौतुक काहींनी केलं तर काही युजर्सनी खिल्ली देखील उडवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here