
सॅमसंग गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येत्या काही दिवसांत अनेक नवीन मोबाइल फोन येतील. यातील Samsung Galaxy A54 5G आणि Samsung Galaxy A34 5G फोन अनेक लीक्स व सर्टिफिकेशन्समधून समोर आले आहेत. तर आता या सीरीजच्या आणखी एका स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A24 चा देखील खुलासा झाला आहे. गॅलेक्सी ए24 सर्टिफिकेशन्स साइट NBTC वर लिस्ट झाला आहे जो पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये लाँच होऊ शकतो.
Samsung Galaxy A24 थायलंडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसीवर लिस्ट करण्यात आला आहे. हा मोबाइल फोन SM-A245F/DSN मॉडेल नंबरसह सर्टिफाइड झाला आहे. विशेष म्हणजे या सर्टिफिकेशनमधून फोनच्या नावाचा खुलासा झाला आहे, त्यामुळे हा मोबाइल गॅलेक्सी ए24 नावानं बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. अशी चर्चा आहे की पुढील महिन्यात मार्चमध्ये कंपनी आपला हा फोन लाँच करेल आणि फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला हा ऑफिशियली टीज केला जाईल. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतात लाँच
Samsung Galaxy A24 Specifications
- 6.4″ AMOLED 90Hz display
- MediaTek Helio G99
- 25W 4,000mAh battery
- 48MP triple rear camera
कंपनीनं आतापर्यंत गॅलेक्सी ए24 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु लीक्स आणि सर्टिफिकेशन्स साइट्सनुसार हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा एक 4जी प्रोसेसर आहे जो 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर चालतो. हा मीडियाटेक प्रोसेसर सामन्यतः मिडबजेट स्मार्टफोन्समध्ये दिला जातो.
Samsung Galaxy A24 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली असेल जी सुपर अॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करेल. हे देखील वाचा: Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली
फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए24 4जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलच्या सेन्सर थर्ड सेन्सरसह येईल. या फोनमध्ये अँड्रॉइड 13 सह वनयुआय 5.0 मिळू शकतो.
















