तब्बल 180 दिवस चालणार BSNL चा जबरदस्त प्लॅन; मोफत कॉलिंग आणि रोज 2GB डेटा

Highlights

  • BSNL च्या या प्लॅनची किंमत 397 रुपये आहे.
  • या प्लॅनमध्ये डेली 100 SMS पण मिळतात.
  • रिचार्जमध्ये मिळणारे फ्री बेनिफिट्स फक्त 60 दिवसांपर्यंत वैध.

सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलकडे असे अनेक प्लॅन आहेत, जे युजर्सना आकर्षित करतात. या रिचार्जच्या लिस्टमधील एका प्रीपेड प्लॅनची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. या प्लॅनमध्ये युजर्सना फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सोबतच दीर्घ वैधता देखील मिळते. जर तुम्ही देखील BSNL Users असाल तर आज आम्ही 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लॅनची माहिती पुढे दिली आहे, ज्या प्लॅन समोर जियो आणि एयरटेलचे प्लॅन तुम्हाला महाग वाटतील. चला जाणून घेऊया आय रिचार्ज बाबत सर्वकाही.

BSNL Rs 397 Plan

बीएसएनएलच्या या प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी म्हणजे 397 रुपये आहे. हा एक एक प्रीपेड रिचार्ज आहे. विशेष म्हणजे बीएसएनएलचा हा प्लॅन Jio, Airtel आणि Vodafone च्या त्या उन सर्व रिचार्ज प्लॅन्सना टक्कर देतो जे 400 रुपयांच्या आत येतात. चला जाणून घेऊया या रिचार्जमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज; Vivo Y100 ची होणार भारतात जबरदस्त एंट्री

मिळेल 120GB डेटा

या प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2जीबी डेटा ऑफर केला जात आहे. यात एकूण 120जीबी डेटा मिळेल कारण या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे सुरुवातीच्या 60 दिवसांसाठी वैध आहेत. परंतु एकूण वैधता 180 दिवस आहे, त्यामुळे जरी तुमचे बेनिफिट दोन महिन्यांनी संपले तरी तुमचं सिम रिचार्जविना आणखी 120 दिवस सक्रिय राहील.

डाटा आणि दीर्घ वैधतेसह या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ देखील मिळेल. तसेच रिचार्जमध्ये डेली 100 एसएमएस म्हणजे एकूण 6000 एसएमएसचा लाभ घेता येईल. जर तुम्ही दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर हा एक बेस्ट रिचार्ज ठरू शकतो. परंतु पुन्हा एकदा लक्षात घ्या की 60 दिवसानंतर डेटा आणि फ्री कॉलिंगसाठी ग्राहकांना वेगळा व्हाउचर रिचार्ज करावा लागेल. हा प्लॅन त्या लोकांसाठी आहे ज्यांना कमी किंमतीत सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवायचं आहे. हे देखील वाचा: अ‍ॅप्पलच्या मॅकबुकला टक्कर देण्यासाठी Samsung Galaxy Book3 सीरीज भारतात लाँच; इतकी आहे किंमत

BSNL आणि MTNL ला 53,000 कोटी रुपये

BSNL आणि MTNL ला 4G आणि 5G वर नेटवर्क अपडेट करण्यासाठी 53,000 कोटी रुपये भारत सरकारकडून दिले जाणार आहेत. BSNL च्या नेटवर्क अपग्रेडमध्ये स्वदेशी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. सध्या ही सरकारी कंपनी मोठ्याप्रमाणावर भारतात 3G सर्व्हिस देत आहे. बुधवारी घोषित करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थ संकल्पात बीएसएनएल आणि एमटीएनएलचं नेटवर्क 4G आणि 5G वर अपग्रेड करण्यासाठी 53,000 कोटी रुपये भारत सरकारकडून मिळणार असल्याची माहिती टेलिकॉम मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here