28 ऑगस्टला लॉन्च होईल रियलमी 2, डुअल कॅमेरा सोबत मिळेल नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची बॅटरी

रियलमी 2 बद्दल कालच आम्ही एक्सक्लूसिव माहिती दिली होती ज्यात फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आज ओपो च्या सब-ब्रांड रियलमी ने फोन ची लॉन्च डेट सांगितली आहे. रियलमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत रियलमी 2 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे . रियलमी 2 स्मार्टफोन येत्या 28 ऑगस्टला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. रियलमी 2 कंपनीचा देशात लॉन्च केला जाणारा दुसरा स्मार्टफोन असेल जो रियलमी 1 चा नेक्स्ट जेनरेशन फोन आहे

रियलमी इंडिया रियलमी 2 च्या डिजाईनची माहिती आम्ही आधीच दिली आहे. तसेच आज कंपनी 28 ऑगस्टला राजधानी मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी रियलमी 2 स्मार्टफोन देशात आॅफिशियली लॉन्च करेल याचा पण खुलासा केला आहे. रियलमी 2 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील नॉच डिस्प्ले आणि याचा डुअल रियर कॅमेरा आहे जो फोनला रियलमी 1 पेक्षा एडवांस आहे. रियलमी 1 मध्ये एकच बॅक कॅमेरा होता तर रियलमी 2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

91मोबाइल्‍स ने सूत्रांकडून कन्फर्म ​केले आहे की रियलमी 2 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मधील एक कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल चा असेल तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा असेल ज्यात डेफ्थ सेंसिंग टेक्नोलॉजी असेल. कॅमेरा सोबत फोनचा पावर सोर्स म्हणजे याच्या बॅटरी ची माहिती आमच्या टीमला मिळाली आहे. रियलमी 2 स्मार्टफोन मध्ये कंपनी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देईल जी फोनला जास्त बॅकअप देईल.

तसेच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रियलमी 2 च्या फोटो वरून समजले आहे की हा फोन पण रियलमी 1 प्रमाणे डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. फोनची बॉडी ग्लासची आहे तर याची फ्रेम मेटल ची वाटते आहे. रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे.

आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते. रियलमी संबधीत माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. पण रियलमी 2 कोणत्या किंमतीत लॉन्च होईल आणि फोनचा पहिला सेल कधी होईल यासाठी 28 ऑगस्टला फोन लॉन्च होण्याची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here