देशातील सर्वात जास्त चर्चित टेलीकॉम कंपनी रिलायंस जियो ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे कि ती का इतर कंपन्यांपेक्षा वेगळी आणि लोकप्रिय आहे. रिलायंस जियो ने आज आर्थिक वर्ष 2018-19 च्या तिसऱ्या तिमाहीचे आकडे शेयरकेले आहेत ज्यात कपंनीच्या नेटवर्क व डेटा यूज सोबत युजरबेसची माहिती देण्यात आली आहे. जियोचे हे आकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आहेत. जियो द्वारा शेयर करण्यात आलेल्या या आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे कि रिलायंस जियो लवकरच भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनेल.
रिलायंस जियो ने सांगितले आहे कि डिसेंबर 2018 वर्यंत कंपनीचा एकूण युजरबेस 280.1 मिलियन झाला आहे. म्हणजे 280,000,000 पेक्षा जास्त स्मार्टफोन युजर जियोचे नेटवर्क वापरत आहेत.
ऑक्टोबर 2018 पासून डिसेंबर 2018 पर्यंत जियो नेटवर्क वर 864 कोटी जीबी चा इंटरनेट डेटा वापरला गेला आहे.
साल 2018 च्या शेवटच्या महिन्यात जियो नेटवर्क वर एकूण 63 हजार 406 कोटी मिनिटे कॉल्स करण्यात आले आहेत.
गेल्या तीन महिन्याच्या सरासरी पाहता जियो नेटवर्क वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने 10.8 जीबी 4जी डेटा वापरला आहे.
तसेच जियो सिम वर एका महिन्यात 794 मिनिटांचे वॉईस कॉल प्रत्येक युजरने केले आहेत.
इंटरनेट वापर पाहता भारतीयांनी जियो इंटरनेटच्या मदतीने एका महिन्यात 460 कोटी तास वीडियो बघतिले आहेत.
रिलायंस जियोची जियोफोन मॉनसून हंगामा ऑफर कंपनीने सर्वात फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे ट्राईच्या रिपोर्ट अनुसार डिसेंबर महिन्यात रिलायंस जियो ने इतर सर्व टेलीकॉम कंपन्यांपेक्षा सर्वात वेगवान 4जी डाउनलोड स्पीड दिला आहे. जियो ने चांगला स्पीड देऊन सर्व टेलीकॉम कंपन्यांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.