लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी चे 2 फोटो, डुअल कॅमेरा सह नॉच डिस्प्ले

मे मध्ये ओपो ने आपल्या सब ब्रँड रियलमी ची सुरवात केली होती आणि रियलमी 1 नावाने आपला पहिला फोन लॉन्च केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव बातमी दिली होती की कंपनी लवकरच रियलमी 1 चा अपग्रेड मॉडेल लॉन्च करणार आहे जो रियलमी 2 नावाने लॉन्च केला जाईल आणि आज हा फोन लॉन्च च्या आधी चुकून कंपनी च्या वेबसाइट वरून ​लीक झाला आहे. तिथे फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही पण लुक स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तुम्ही बदल पण बघू शकता.

लीक फोटो नुसार रियलमी 2 पण डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. यावेळी फ्रंटला नॉच डिस्प्ले मिळेल तर मागच्या पॅनल वर डुअल कॅमेरा स्पष्ट दिसत आहे. कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध फोटो ब्लू आणि ब्लॅक रंगात आहे. फोन ची बॉडी ग्लास ची आहे तर फ्रेम मेटल ची वाटते. विशेष म्हणजे मागच्या वेळी रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते.

रियलमी बद्दल माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here