दोन दिवसांत विकले गेले 3,70,000 रियलमी 2 फोन, पुढील सेल 18 सप्टेंबरला, रियलमी 2 प्रो ची पण मिळाली माहिती

रियलमी ने ऑगस्ट 28 ला भारतात आपला दुसरा स्मार्टफोन रियलमी 2 लॉन्च केला होता. फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता बोलेले जात आहे की हा एक यशस्वी डिवाईस होईल आणि शाओमी ला चांगली टक्कर देईल. 4 सप्टेंबरला रियलमी 2 आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता त्याच पहिल्या फर्स्ट सेल मध्ये फोनचे 2 लाख यूनिट विकले गेले होते. तसेच आज पुन्हा रियलमी 2 ने आपल्या फ्लॅश सेल मध्ये 1 लाख 70 हजार स्मार्टफोन विकून रेकॉर्ड सेल केला आहे.

रियलमी इंडिया ने आपल्या ट्वीटर हँडल वरून माहिती दिली आहे की रियलमी 2 ने फक्त दोन फ्लॅश सेल मध्येच 3 लाख 70 हजार पेक्षा जास्त हँडसेट विकले आहेत. रियलमी नुसार गेल्या 4 सप्टेंबरला रियलमी 2 चे 2 लाख यूनिट विकले गेले होते तसेच आज 11 सप्टेंबरला आयोजित झालेल्या दुसर्‍या फ्लॅश सेल मध्ये रियलमी 2 चे एक लाख सत्तर हजार यूनिट विकले गेले आहेत. अशा प्रकारे दोन फ्लॅश सेल मध्ये रियलमी 2 चे 3,70,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

या रेकॉर्ड सेलची माहिती देण्यासोबतच रियलमी ने सांगितले आहे की रियलमी 2 चा पुढील फ्लॅश सेल 18 सप्टेंबरला आयोजित होईल तसेच आपल्या फॅन्सच्या ट्वीट ला उत्तर देताना कंपनी ने रियलमी 2 प्रो लवकरच लॉन्च होणार असल्याचे सांगितले आहे. एक यूजर च्या ट्वीटला उत्तर देताना रियलमी 2 ने लिहिले आहे ‘रियलमी 2 प्रो आता जास्त दूर नाही’ म्हणजे हा फोन पण लवकरच लॉन्च करण्यात येईल.

रियलमी 2 किंमत पाहता देशात हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 2 च्या फुल स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here