चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने नुकताच भारतातील पहिला 5जी फोन Realme X50 Pro लॉन्च केला होता. आता कंपनीने अधीकृत घोषणा करून माहिती दिली आहे कि Realme 6 सीरीज 5 मार्चला सादर केली जाईल. मंगळवारी रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ यांनी आपला एक फोटो बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान सोबत पोस्ट केला होता, ज्यावरून रियलमी 6 च्या लॉन्चची माहिती मिळाली होती. आता अधीकृत ट्विटर हँडेल वरून ट्विट करून रियलमीने माहिती दिली आहे कि कंपनी Realme 6 आणि Realme 6 Pro लॉन्च करेल.
कंपनीने ट्विट मध्ये रियलमी 6 आणि रियलमी 6 प्रो चे नाव स्पष्टपणे लिहिले आहे. तसेच माहिती दिली आहे कि कंपनी फोन 64-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह सादर करेल. कंपनीने फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही. ट्विट नुसार कंपनी 5 मार्चला 12:30 वाजता लॉन्च इवेंट सुरु करेल. तुम्ही या लिंक वर क्लिक करून इवेंट लाइव बघू शकता. तसेच कंपनीने आपल्या वेबसाइट वर फोन लिस्ट केला आहे, ज्या सोबत काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.
Welcoming @BeingSalmanKhan as the ambassador of @realmemobiles!
Now it's time to make it grander! Unveiling 64MP #ProCameraProDisplay with #realme6 & #realme6Pro.
Witness the launch live at 12:30 PM, 5th March.
Know more: https://t.co/83RpVna6dw pic.twitter.com/V5w53O1Qow— realme (@realmemobiles) February 26, 2020
ब्लाईंड ऑर्डर
कंपनीने या सीरीजच्या फोन्ससाठी आपल्या वेबसाइट वर ब्लाईंड ऑर्डरची माहिती पण दिली आहे. हि ब्लाईंड ऑर्डर 26 फेब्रुवारी पासून सुरु होईल जी 4 मार्च पर्यंत चालेल. या काळात ग्राहक 1000 रुपये देऊन फोन प्री-बुक करू शकतात. रियलमी 6 सह ग्राहकांना रियलमी बड्स 2 फ्री मिळतील. तसेच रियलमी 6 प्रो सह 1000 रुपयांचे गिफ्ट वाउचर मिळतील.
डिजाइन
Realme 6 सिंगल पंच-होल आणि Realme 6 Pro डुअल पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. अशीच डिजाइन रियलमी एक्स50 प्रो मध्ये बघितली आहे. त्याचबरोबर बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा दिला जाईल जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट असेल.
दमदार कॅमेरा
तसेच रियलमी 6 सीरीजच्या के फोन मध्ये 64-मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सपोर्ट असेल. या कॅमेरा सेटअप मध्ये अल्ट्रा वाइड लेंस, 64MP प्राइमरी लेंस, टेलीफोटो लेंस आणि मॅक्रो लेंस असेल. सध्या प्राइमरी सेंसर व्यतिरिक्त दुसऱ्या सेंसरची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच फोन्स मध्ये 20एक्स झूम पावर क्षमता असेल. वीडियो कॉल आणि सेल्फीसाठी रियलमी 6 प्रो च्या फ्रंटला डुअल इन-डिस्प्ले कॅमेरा असेल, ज्याच्या माध्यमातून अल्ट्रा-वाइड सेल्फी काढता येईल. तर रियलमी 6 च्या फ्रंटला पंच होल सिंगल सेल्फी कॅमेरा असेल.
याव्यतिरिक्त वेबसाइट वर समोर आले आहे कि रियलमी 6 सीरीजच्या दोन्ही फोन्स मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश्ड रेट असलेला डुअल पंच होल डिस्प्ले मिळेल. तसेच फोन फास्ट चार्ज करण्यासाठी 30 वॉट फ्लॅश चार्ज सपोर्ट असेल. फोनच्या बॅटरी बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.















