5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर

Realme ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनी ने Realme 3 Pro आणि Realme C2 सादर केले होते. Realme 3 Pro 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला तर Realme C2 कंपनी ने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला होता. कंपनीने या फोनची सुरवाती किंमत 5,999 रुपये ठेवली होती. Realme 3 Pro तर लॉन्च नंतर देशात सेल साठी उपलब्ध झाला होता पण Realme C2 कंपनीने बाजारात आणला नव्हता. आता Realme C2 पण सेल साठी समोर आला आहे. Realme चा हा स्वस्त स्मार्टफोन येत्या 15 मे पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

Realme C2 च्या सेल साठी कंपनी ने शॉपिंग साइट फ्लिपकार्टशी भागेदारी केली आहे. फ्लिपकार्ट वर Realme C2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर 15 मे च्या तारीखेसह दुपारी 12 ची वेळ देण्यात आली आहे. Realme C2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 2जीबी रॅम वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme C2
रियलमीच्या या स्वस्त स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.1-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme C2 कलरओएस 6.0 वर आधारित एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर सह 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हेलीयो पी22 चिपसेट​ देण्यात आला आहे.

वर सांगितल्याप्रमाणे Realme C2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Realme C2 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी एलटीई सोबत हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो.

फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फिजिकल ​फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. पण Realme C2 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये माइक्रो यूएसबी 2.0 पोर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here