64MP कॅमेरा, 128GB मेमरी असलेल्या Redmi Note 10 Pro वर 20 टक्क्यांची सूट; स्वस्तात टॉप फिचर

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सध्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल सुरु आहे. हा सेल 6 ऑगस्टपासून 10 ऑगस्ट पर्यंत चालू राहील. या सेल अंतगर्त अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही एक शानदार स्मार्टफोन कमी किंमतीत विकत घेण्याचा विचार करत असाल तर, Redmi चा Redmi Note 10 Pro डिवाइस तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. हा शानदार डिवाइस भारतीय ग्राहकांना खूप आवडला आहे आणि आतापर्यंत याला अ‍ॅमेझॉनवर खूप चांगली रेटिंग मिळाली आहे. खास बाब म्हणजे हा डिवाइस सध्या खूप कमी किंमतीत विकला जात आहे. कंपनी Redmi Note 10 Pro वर सुमारे 4,000 रुपयांच्या डिस्काउंटसह बँक ऑफर आणि EMI ऑप्शनसह अन्य काही डील्स देखील देत आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या सर्व ऑफर्सबाबत.

Redmi Note 10 Pro वरील ऑफर्स

Redmi Note 10 Pro ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 19,999 मध्ये विकला जात होता. परंतु सेलमध्ये या फोनवर 20 टक्के म्हणजे 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे, या मोठ्या डिस्काउंटनंतर तुम्ही हा डिवाइस फक्त 15,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. ही डिवाइसच्या 6GB रॅम व 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. तासेक्स फोनसाठी ग्राहकांना डार्क नाइट कलर ऑप्शन मिळेल. त्याचबरोबर बँक ऑफर अंतगर्त एसबीआय क्रेडिट कार्डवर नॉन EMI ट्रांजॅक्शनच्या मदतीने फोन घेतल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. तर EMI ऑप्शनवर देखील 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. परंतु या ऑफरसाठी तुम्हाला कमीत कमी 5,000 रुपयांचे ट्रांजॅक्शन करावं लागेल. तसेच नो कॉस्ट EMI ऑप्शनच्या माध्यमातून देखील तुम्ही हा फोन विकत घेऊ शकता.

Redmi Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात HDR 10 सपोर्ट, 1200nits पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळते. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. शानदार ऑडियोसाठी Hi-Res सपोर्टसह स्टीरियो स्पिकर देखील मिळतात.

फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम Snapdragon 732G प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला ग्राफिक्ससाठी Adreno 618 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो. सोबतीला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देखील मिळते. फोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

असा आहे कॅमेरा

Redmi Note 10 Pro क्वॉड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2x झूम सह 5-मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स, 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड-अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here