1699 रुपयांमध्ये नोकियाचा दमदार बिल्ड असलेला फोन आला; Nokia 110 मध्ये बॅटरी देखील पावरफुल

Nokia सध्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये जास्त सक्रिय झाली आहे. परंतु जुने फिचर फोन्स नव्या स्वरूपात सादर करून जुन्या आठवणी ताज्या करण्याचं काम देखील कंपनी करत आहे. अलीकडेच कंपनीनं भारतात दोन नवीन फीचर फोन सादर केले आहेत. यात Nokia 8210 4G आणि Nokia 110 (2022) चा समावेश आहे. यातील पहिला फोन 90 च्या दशकातील मॉडेलचा 4G व्हर्जन आहे. तर कंपनीच्या लेटेस्ट फीचर फोन Nokia 110 (2022) मध्ये कंपनीनं ऑटो कॉल रेकॉर्डिंग आणि बिल्ट इन रियर कॅमेरा असे फीचर्स दिले आहेत.

Nokia 110 (2022) हा फोन दमदार बिल्ड क्वॉलिटी आणि नोकियाच्या सिग्नेचर डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. नव्या Nokia 110 (2022) स्मार्टफोनमध्ये स्लीक डिजाइन आणि लॉन्ग लास्टिंग बॅटरी मिळते. तसेच या नोकिया फोनवर कंपनी एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे. नोकियाचा हा फोन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून भारतीय ग्राहकांना विकत घेता येईल. हे देखील वाचा: 27 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह आला Nokia चा स्वस्त 4G फोन

Nokia 110 (2022) चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 110 (2022) स्मार्टफोन नवीन स्लीक डिजाइनसह सादर करण्यात आला आहे ज्याची बिल्ड क्वॉलिटी खूप मजबूत आहे. डिजाइन पाहता नोकियाचा हा फोन कंपनीच्या जुन्या फोन्सची आठवण करवून देतो. कंपनीनं लेटेस्ट फिचरफोन कॉम्पेक्ट डिजाइन, सहज वापर आणि नवीन मॉर्डन फिनिशसह सादर केला आहे. या नोकिया फोनमध्ये रियर कॅमेरा, म्यूजिक प्लेयर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंगसह जास्त स्टोरेज देण्यात आली आहे.

Nokia 110 (2022) स्मार्टफोनमध्ये 1000mAh ची बॅटरी मिळते. जी सिंगल चार्जवर देखील अनेक दिवस बॅकअप देऊ शकते. या फोनची स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 32GB एक्सपांडेबल स्टोरेज कपॅसिटीसह सादर करण्यात आला आह. यात FM रेडिओ फीचर देखील युजर्सच्या करमणुकीसाठी देण्यात आलं आहे. फोनमध्ये बिल्ट-इन टॉर्च देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनमध्ये नोकियाचा पॉपुलर स्नेक गेम देखील प्री-लोडेड मिळतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला Nokia चा दणका! तीन दिवस पुरणारी बॅटरी आणि 3 कॅमेऱ्यांसह स्वस्त फोन लाँच

Nokia 110 (2022) किंमत आणि उपलब्धता

Nokia 110 स्मार्टफोन चारकोल, स्यान आणि रोज गोल्ड या तीन रंगात ग्राहकांच्या भेटीला आला आहे. नोकियाच्या या फोनचे स्यान आणि चारकोल व्हेरिएंट 1699 रुपये आणि रोज गोल्ड व्हेरिएंट 1799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन रिटेल आउटलेट, ई-कॉमर्स आणि नोकियाच्या वेबसाईटवरून विकत घेतल्यास 299 रुपयांचे इयरफोन तुम्हाला अगदी फ्री दिले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here