Realme Narzo N55 भारतात लाँच! यात आहे 33W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 6GB RAM

Highlights

    Realme Narzo N55 भारतात लाँच झाला आहे.
  • हा MediaTek Helio G88 वर चालतो.
  • रियलमी मोबाइलमध्ये 33W Charging देण्यात आली आहे.

Realme Narzo N55 आज भारतात लाँच झाला आहे. नारजो हा रियलमीचा सब ब्रँड आहे, ज्यांतर्गत कंपनीनं नवीन एन लाइनअप सुरु केली आहे. नारजो एन सीरिजचा हा मोबाइल 33W Fast Charging, 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G88 प्रोसेसर 5,500mAh Battery अशा स्पेसिफिकेशन्ससह भारतात सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही रियलमी नारजो एन55 ची संपूर्ण माहिती दिली आहे.

रियलमी नारजो एन55 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72” 90Hz FHD+ Display
  • 64MP Dual camera
  • MediaTek Helio G88
  • 6GB RAM, 128GB Storage
  • 33W Fast Charging, 5000mAh Battery

Realme Narzo N55 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनची स्क्रीन पंच होल स्टाईल डिजाइन आणि 91.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करते. या फोनचा टच सॅम्पलिंग रेट 180हर्ट्झ आणि ब्राइटनेस 680निट्झ आहे.

रियलमी नारजो एन55 लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2 गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी52 जीपीयू आहे. हा रियलमी मोबाइल 6जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी Realme Narzo N55 च्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हा एक ड्युअल सिम 4जी फोन आहे, जो एकाच वेळी दोन नॅनो सिम आणि मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करतो. तुम्ही यात 1टीबी पर्यंतच्या मेमरी कार्डचा सहज वापर करू शकता. तर यातील डायनॅमिक रॅम फिचरच्या मदतीनं 6जीबी पर्यंत अतिरिक्त रॅम मिळवू शकता. कंपनीनं यात मिनी कॅप्सूल हे आयफोनमधील डायनॅमिक आयलँड सारखं फिचर देखील दिलं आहे. तसेच सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

रियलमी नारजो एन 55 ची किंमत

Realme Narzo N55 चे दोन मॉडेल भारतात आले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे, जो 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेजसह येतो. तर फोनच्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर एचडीएफसी आणि एसबीआयच्या कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. Realme Narzo N55 स्मार्टफोन 18 एप्रिलपासून अ‍ॅमेझॉन आणि रियलमी स्टोरवर उपलब्ध होईल. तसेच उद्या दुपारी 12:00 वाजता कंपनीनं एक स्पेशल सेल देखील आयोजित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here