मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटसह Realme V23i 5G ची बाजारात एंट्री

रियलमी कंपनीनं टेक मंचावर आपल्या ‘वी’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन रियलमी वी23आय लाँच केला आहे. हा एक मिड बजेट मोबाइल फोन आहे जो 4GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि 10W 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे जो येत्या काही दिवसांत जगभरात सादर केला जाईल. पुढे Realme V23i प्राइस, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Realme V23i ची किंमत

रियलमी वी23आय स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये आला आहे. चीनी बाजारात या मोबाइलला 4GB RAM+ 128GB Storage वर लाँच करण्यात आला आहे ज्याची किंमत 1399 युआन आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 16,400 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये रियलमी वी23आय Mountain Blue आणि Jade Black कलरमध्ये लाँच केला करण्यात आला आहे. हे देखील वाचा: जबरदस्त! 240KM च्या दमदार रेंजसह आली इलेक्ट्रिक स्कूटर; डिजाइन आणि फीचर्स देखील एक नंबर

Realme V23i स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

  • 4GB RAM+ 128GB Storage
  • MediaTek Dimensity 700 चिपसेट
  • 13MP + 2MP Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

रियलमी वी23आय 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असेलल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये वरच्या बाजूला मध्यभागी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे.

Realme V23i 5G Phone अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 4 जीबी रॅमसह आला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी रियलमी वी23आयमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 10 हजारांच्या आत नोकियाचा ‘वॉटर रेजिस्टंट’ फोन लाँच; Nokia C31 देतो तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप

Realme V23i 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी वी23आय 5जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here