Redmi 13 5G फोनची लवकर होऊ शकते एंट्री, स्पेसिफिकेशनसह जाणून घ्या काय माहिती आली समोर

Redmi 13 5G फोनबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बोलले जात आहे की हा मोबाईल फोन लवकरच मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. भारतीय रेडमी चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे, होय, हे जाणून घेतल्यावर काही प्रमाणात निराशा पण वाटू शकते. हा फोन भारतीय बाजारात रेडमी ब्रँड अंतर्गत नाही तर Poco M7 Pro 5G नावाने विकला जाऊ शकतो.

Redmi 13 5G ची माहिती

रेडमी 13 5 जी फोनची माहिती अँड्रॉईड हेडलाईन्स वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टमध्ये या फोनचा कोडनेम “breeze“ सांगण्यात आला आहे. या फोनचे 2406ERN9CI, 2406ERN9CC आणि 24066PC95I मॉडेल नंबर समोर आले आहेत तसेच यामधील एक ‘इंडियन’ मॉडेल सांगण्यात आले आहे. तसेच या रिपोर्टमध्ये या गोष्टीचा पण अंदाज लावला जात आहे की Redmi 13 5G फोन भारतात Poco M7 Pro 5G नावाने लाँच होऊ शकतो.

Redmi 13 5G ची किंमत

लीकमध्ये दावा केला जात आहे की रेडमी 13 5 जी फोन भारतीय बाजारात असलेल्या Redmi 12 5G फोनपेक्षा खूप जास्त वेगळा नसेल. दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन मिळते जुळते असणार आहेत, तसेच Redmi 13 5G ची किंमत पण या रेंजमध्ये ठेवली जाईल. लीकनुसार रेडमी 13 5 जी ची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. म्हणजे भारतात येणारा Poco M7 Pro 5G फोन 10,999 रुपयांमध्ये ​विकला जाईल.

Redmi 13 5G स्पेसिफिकेशन (लीक)

स्क्रीन : Redmi 13 5G म्हणजे Poco M7 Pro 5G भारतात 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच होऊ शकतो. ही एलसीडी स्क्रीन असू शकते ज्यावर 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.

प्रोसेसर : अपकमिंग रेडमी फोन अँड्रॉईड 14 आधारित हायपरओएसवर लाँच केला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची चर्चा आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Poco M7 Pro 5G (Redmi 13 5G) भारतात 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. तसेच या मोबाईलच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा पाहायला मिळू शकतो.

बॅटरी : रेडमी 13 5जी म्हणजे पोको एम 7 प्रो 5 जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 6,000 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग दिली जाणार असल्याचा अंदाज आहे.

Redmi 12 5G ची किंमत

रेडमी 12 5 जी फोन पाहता हा मोबाईल तीन व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याच्या 4GB RAM + 128GB Storage ची किंमत 11,999 रुपये आहे तसेच 4GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच सर्वात मोठा Redmi 12 5G 8GB RAM + 256GB Storage ला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 14,999 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here