Samsung Galaxy S23 Ultra सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट; मिळू शकतो 6.8 इंचाचा मोठा डिस्प्ले

प्रतीकात्मक इमेज

Samsung Galaxy S23 Ultra फक्त सॅमसंगच नाही तर संपूर्ण मोबाइल इंडस्ट्रीचा सर्वात पावरफुल आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्स पैकी एक असेल. हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेल्या या फ्लॅगशिप फोनची मोबाइल युजर्ससह टेक विश्वातील लोक देखील वाट पाहत आहे. हा स्मार्टफोन साल 2023 मध्ये बाजारात येईल, परंतु आज मोठी बातमी आली आहे की Samsung Galaxy S23 Ultra सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे, जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

Samsung Galaxy S23 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले – थेट सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स पाहायचे झाले तर लिस्टिंगनुसार हा मोबाइल फोन 19.3:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर केला जाऊ शकतो 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. यात 16.7एम कलरचा सपोर्ट देखील मिळू शकतो. हे देखील वाचा: VI च्या ग्राहकांसाठी अच्छे दिन; कंपनी मोफत देतेय अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग

रॅम/स्टोरेज – Samsung Galaxy S23 Ultra च्या रॅम व स्टोरेजची माहिती देखील टेनावर मिळाली आहे. सर्टिफिकेशन्स साइटवर हा सॅमसंग फोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. तर स्टोरेज पाहता टेनावर हा स्मार्टफोन 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजसह लिस्ट झाला आहे.

प्रोसेसर – सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर असल्याचा खुलासा टेनावर झाला आहे. इथे स्मार्टफोनमध्ये 3.36GHz, 2.8GHz आणि 2.0GHz क्लॉक स्पीड असलेला कोर असल्याचं सांगण्यात आला आहे. जीपीयू डिटेल्स पाहता Galaxy S23 Ultra क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.

कॅमेरा – फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 200 मेगापिक्सल आणि 108 मेगापिक्सल लेन्स मिळू शकते. तसेच मागे 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर दिले जाऊ शकतात. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: 425km रेंज येतेय MG 4 EV; Auto Expo 2023 मधून दिसेल पहिली झलक

बॅटरी – Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन 4,885एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. टेनावर या फोनचे डायमेंशन 163.4 x 78.1 x 8.9एमएम आणि वजन 233ग्राम दाखवण्यात आलं आहे. सर्टिफिकेशनमध्ये हा सॅमसंग स्मार्टफोन SM-S9180 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे ज्याची माहिती आम्हाला जीएसएम एरिना वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here