आपल्या किफायतशीर फोनसाठी प्रसिद्ध असलेल्या Xiaomi ने यावर्षी फेब्रुवारी मध्ये लो बजेट स्मार्टफोन Redmi 8A Dual लॉन्च केला होता. आता शाओमीने Redmi 8A Dual चा 3GB रॅम आणि 64GB वेरिएंट सादर केला आहे. याची माहिती शाओमी इंडियाचे चीफ मनु कुमार जैन यांनी दिली आहे. डिवाइसच्या इतर दोन वेरिएंटच्या किंमतीत आता पर्यंत दोनदा वाढ करण्यात आली आहे.
मनु कुमार जैन यांनी ट्विट करून रेडमी 8ए डुअल चा नवीन वेरिएंट सादर केला आहे. या डिवाइसचा नवीन वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच 15 जून दुपारी 12 वाजल्यापासून हँडसेट विक्रीसाठी मी.कॉम, अमेझॉन इंडिया आणि रिटेल आउटलेट्स वर उपलब्ध केला जाईल.
एकंदरीत आता Xiaomi Redmi 8A Dual तीन वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. डिवाइसच्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आणि 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. तर नवीन 3GB रॅम आणि 64GB वेरिएंट 12 जून पासून 8,999 रुपयांमध्ये विक्री केला जाईल.
https://img.hi.91mobiles.com/uploads/2020/02/Redmi-8A-Dual-1.jpg
Redmi 8A Dual चे स्पेसिफिकेशन्स
सस्पेसिफिकेशन्स पाहता Xiaomi Redmi 8A Dual मध्ये 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.22 इंचाचा एचडी+ आईपीएस डॉटनॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनीने रेडमी 8ए डुअल पी21आई नॅनो कोटिंगने कवर केला आहे जी फोनला हलक्या फुलक्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवते. रेडमी 8ए डुअल कंपनीने ब्लू, वाईट आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या डिजाईनला Xiaomi ने ऑरा ग्रिल एक्स डिजाईनचे नाव दिले आहे.
Xiaomi Redmi 8A Dual एंडरॉयड आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. शाओमी रेडमी 8ए डुअल दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Redmi 8A Dual डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे रेडमी 8ए डुअल च्या फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरा सेंसर्स मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे.
Xiaomi Redmi 8A Dual हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड सह एक मेमरी कार्ड पण वापरता येते. हा स्मार्टफोन 4जी वोएलटीई सोबत वोवाई-फाई फीचरला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Xiaomi Redmi 8A Dual मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट सपोर्ट असेलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. पण बॉक्स मध्ये 10वॉटचा चार्जर मिळेल. शाओमी रेडमी 8ए डुअल टाईप-सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो तसेच हा फोन रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी सह पण येतो.
शाओमी रेडमी 8ए डुअल वीडियो















