या महिन्यात चीन मध्ये शाओमी रेडमी नोट 7 लॉन्च केला गेला होता. 48-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. तसेच याचा अजून एक वेरिएंट म्हणजे रेडमी नोट 7 प्रो लॉन्च होणार असल्याचे समोर येत आहे. कंपनी ने नोट 7 मध्ये सॅमसंग सेंसरचा वापर केला होता. तर दुसऱ्या वेरिएंट म्हणजे नोट 7 प्रो बद्दल बोलले जात आहे कि यात सोनी आईएमएक्स586 इमेज सेंसर असेलला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.
आता रेडमीचे सीईओ लू विबिंग ने नोट 7 प्रो बद्दल नवीन माहिती दिली आहे. लू ने वीबो वर फॅन्सना विचारले होते कि रेडमी नोट 7 प्रो मध्ये त्यांना काय हवे. त्याचे उत्तर देताना लोकांनी यात 3/32 जीबी, 6/64 जीबी आणि 6/128 जीबी वर्जन आसवे असे सांगतिले, अशा आहे कि डिवाइस मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल.
अलीकडेच शाओमी ने आपल्या सब-ब्रँड रेडमी मध्ये आपला पाहील स्मार्टफोन रेडमी नोट 7 लॉन्च केला होता, ज्याबद्दल कंपनी ने लक्ष्य ठेवले आहे कि ते पहिल्या महिन्यात या डिवाइसचे 10 लाख यूनिट्स विकेल. रेडमी नोट 7 हँडसेटची खासियत पाहता हा 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
तसेच स्मार्टफोन मध्ये f/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी यात 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. शाओमी रेडमी नोट 7 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम आणि 64जीबी आणि 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरियंट सह येतो.















