Redmi Note 9 सीरीज भारतासहित अनेक मार्केट मध्ये आली आहे. पण अजूनतरी Xiaomi ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये हि सीरीज सादर केली नाही कारण कंपनी चीन मध्ये हि सीरीज 5G सह सादर करणार आहे. Xiaomi ने अलीकडेच सांगितले आहे कि Redmi Note 9 5G आणि याचा प्रो वेरिएंट चीन मध्ये 26 नोव्हेंबरला लॉन्च केला जाईल. 5जी कनेक्टिविटी व्यतिरिक्त फोन मध्ये ग्लोबल रेडमी नोट 9 मॉडेलच्या तुलनेत काही इतर बदल असण्याची शक्यता आहे. याचकारणामुळे Redmi Note 9 5G भारतासहित इतर ग्लोबल बाजारांमध्ये Redmi Note 9T म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. आता Redmi Note 9 Pro 5G च्या लॉन्चच्या आधी याचे स्पेसिफिकेशन्स गीकबेंच वर समोर आले आहेत.
बेंचमार्किंग साइट Geekbench लिस्टिंग नुसार Redmi Note 9 Pro 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G चिपसेट असेल. तसेच यात ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU दिला जाईल. तसेच बेंचमार्किंग साइट वर समोर आले आहे कि रेडमी नोट 9 प्रो 5जी मध्ये 8GB रॅम आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल. इतकेच नव्हे तर डिवाइसला सिंगल-कोर मध्ये 645 गुण आणि मल्टी कोर मध्ये 1963 गुण मिळाले आहेत.
टेना लिस्टिंग
गीकबेंच रिपोर्ट मधून आले आहे कि Redmi Note 9 Pro 5G काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Mi 10T Lite चा रिब्रँडेड वर्जन असेल. रेडमी नोट 9 5जी मॉडेल नंबर M2007J22C सह अलीकडेच TENAA वर दिसला होता. फोन 6.53 इंचाच्या फुल-एचडी+ आईपीएस डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी 800यू चिपसेट, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह येण्याची शक्यता आहे. तसेच लिस्टिंग वरून समजले आहे कि Redmi Note 9 5G मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल.
किंमत
काही दिवसांपूर्वी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि रेडमी नोट 9 5जी 1,000 चीनी युआन (जवळपास 11,300 रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, Redmi Note 9 Pro 5G ची किंमत 1,500 चीनी युआन (जवळपास 17,000 रुपये) असू शकते.














