Jio ने दिला अजून एक झटका, या प्लानची वैधता कमी करून केली 24 दिवस

Reliance Jio ने दीर्घकाळ आपल्या यूजर्सना फ्री सर्विस आणि खूप कमी टॅरिफ वर बेनिफिट्स दिले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून Jio आपल्या कठोर आणि छुप्या निर्णयांमुळे टेलीकॉम यूजर्सच्या टीकेस पात्र ठरली आहे. अनलिमिटेड फ्री वॉयस कॉलिंगच्या वाचनानंतर जेव्हा Jio ने आईयूसी च्या नावावर लोकांकडून नॉन जियो नंबर वर कॉल करण्याचे पैसे घेतले तेव्हा अनेक Jio यूजर्सना हे आवडले नाही. आपल्या या कठोर कारवाईनंतर आता Jio ने आपल्या यूजर्सना अजून एक झटका दिला आहे. कंपनीने अपने 149 रुपयांच्या प्रसिद्ध JIO ALL-IN-ONE PLAN ची वैधता 4 दिवस कमी केली आहे.

Jio ने IUC चार्ज सहित म्हणजे नॉन जियो नंबर्स वर कॉलिंग साठी काही खास प्लान सादर केले आहेत, ज्यात 149 रुपयांचा प्लान खूप महत्वाचा आहे. हा प्लान कंपनीने 28 दिवसांच्या वैधतेसह सादर केला गेला होता, ज्यात यूजर्सना 4जी इंटरनेट डेटा आणि एसएमएस सह ऑननेटवर्क तसेच ऑफनेटवर्क कॉलिंगची सुविधा पण मिळत होती. हा प्लान कंपनीने 28 दिवसांसाठी सादर केला होता. पण आता Reliance Jio ने प्लानची वैधता 4 दिवस कमी केली आहे. म्हणजे आता हा 149 रुपयांचा प्लान फक्त 24 दिवसांसाठी वैध असेल.

असे आहेत बेनिफिट

Reliance Jio च्या 149 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर आता पासून हा प्लान 24 दिवसांच्या वैधतेसह येईल. या प्लान अंतर्गत कंपनी यूजर्सना रोज 1.5जीबी 4जी इंटरनेट डेटा देत आहे. या हिशोबाने यूजर्सना एका रिचार्ज मध्ये एकूण 36 जीबी 4जी डेटा मिळेल. तसेच कंपनी या प्लान मध्ये जियो नंबर वर तर अनलिमिटेड वॉयस कॉल देत आहे पण जियो व्यतिरिक्त इतर नेटवर्क वर कॉल करण्यासाठी Jio ग्राहकांना 300 मिनिट मिळतील. कंपनी प्लान मध्ये रोज 100 एसएमएस पण देत आहेत.

JIO ALL-IN-ONE PLANS

Jio च्या 222 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर हा प्लान पण प्रीपेड ग्राहकांसाठी आहे जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. कंपनी या प्लान मध्ये पण यूजर्सना रोज साठी 2 जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी स्पीड वर वापरता येतो. या प्लान मध्ये ऑन नेटवर्क वॉयस कॉलिंग फ्री आहे तर ऑफ नेटवर्क कॉल साठी 1000 मिनिट्स दिले जातात.

Reliance Jio च्या प्लान्स बद्दल बोलायचे तर कंपनीने 333 रूपये, 444 रूपये आणि 555 रुपयांचे प्लान लॉन्च केले आहेत. जियो आपल्या प्लान मध्ये 1000 आईयूसी मिनिट्स देईल. कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लान मध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह रोज 2 जीबी डेटा मिळतो. त्याचप्रमाणे 444 रुपये आणि 555 रुपयांच्या प्लान मध्ये पण रोज 2 जीबी डेटा मिळत आहे. Jio चा 444 रुपयांचा प्लान 84 दिवसांसाठी येतो तर 555 रुपयांच्या प्लानची वैधता पण 84 दिवस आहे पण या प्लान मध्ये यूजर्सना 3000 आईयूसी मिनिट्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here