सणासुदीच्या काळात रिलायंस जियो ने आपला किफायतशीर स्मार्ट फीचर फोन Jio Phone 699 रुपयांमध्ये विकण्याचा निर्णय घेतला आहे. हि माहिती कंपनीने स्वतः दिली आहे. जियो फोन जुलै 2017 मध्ये 1,500 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी हा फोन एक्सचेंज ऑफर अंतर्गत 501 रुपयांमध्ये विकला जात होता.
आता टेलीकॉम कंपनीने घोषणा केली आहे कि जियो फोन फक्त 699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनची हि किंमत “Jio Phone Diwali 2019” ऑफरचा भाग आहे. या ऑफरची सुरवात दसऱ्याला (8 ऑक्टोबर) होईल जी दिवाळी (27 ऑक्टोबर) पर्यंत चालू राहील.
मिळतील डेटा बेनिफिट्स
रिलायंस जियोकडून जियो फोन रीचार्ज केल्यास ग्राहकांना 700 रुपयांचा अजून फायदा होईल यात यूजर्सना पहिल्या सात सात रीचार्ज वर एक्सट्रा डेटा मिळेल. कंपनी 99 रुपयांचा डेटा अकाउंट मध्ये क्रेडिट करेल. याचा अर्थ असा कि तुम्हाला कमी किंमतीत फोन सह डेटा लाभ मिळेल.
स्पेसिफिकेशन्स
जियोफोन मध्ये 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए (240×320 पिक्सल) डिस्प्ले आहे. तसेच यात 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 512 एमबी रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 4 जीबी आहे.
फोटोग्राफी साठी मागे 2-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि आणि फ्रंट पॅनल वर वीजीए कॅमेरा आहे. जियो फोनची बॅटरी 2000 एमएएच आहे. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ वी4.1, वाई-फाई, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 सपोर्टचा समावेश आहे.














