​जियो ने एयरटेल ला दिले धमाकेदार उत्तर, 120 रुपयांमध्ये 84जीबी 4जी डाटा, आता येईल मजा

काही दिवसांपूर्वी एयरटेल ने 399 रुपयांमध्ये डेली तिन जीबी डाटा वाला प्लान सादर केला होता. त्यानंतर चर्चा सुरू झाली की कंपनी चा हा प्लान जियो पेक्षा पण स्वस्त आहे. पण याला लॉन्च होऊन दोनच दिवस झाले होते की जियो ने डबल धमाका आॅफर आणून एयरटेल सडेतोड उत्तर दिले आहे. याचबरोबर कंपनी आपल्या ते वक्तव्य पण कायम ठेवले आहे ज्यात कंपनी ने भारतात सर्वात कमी किंमतीत 4जी डाटा देण्याचा विश्वास दिला होता. मुकेश अंबानी की कंपनी रिलायंस जियो ने आज आपल्या टॅरीफ प्लान मध्ये बदल केला आहे आणि कंपनी ने डबल धमाका नावाने आॅफर सादर केली आहे. या आॅफर बद्दल माहिती घेतल्या नंतर तुम्ही पण म्हणाल ही खरच हा रिलायंस चा हा धमाका आहे.

पुन्हा एकदा असाच डाव खेळत जियो ने आपल्या टॅरिफ प्लान्स मध्ये बदल केले आहेत. जियो ने आपले प्लान्स अपडेट केले आहेत. या अपडेट मध्ये फक्त एक-दोन जीबी डाटा चा फायदा होत नाही तर प्रत्येक पॅक मध्ये प्रतिदिन मिळणार्‍या डाटा मध्ये 1.5जीबी डाटा अतिरिक्त दिला जाईल. म्हणजे रोज एक्स्ट्रा 1.5 जीबी डाटा, तो पण अगदी मोफत.

​रिलायंस जियो ने आपले ते सर्व प्रीपेड प्लान्स अपडेट केले आहेत जे 28 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वॅलिडिटी सह येतात. उदाहरणार्थ 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येणार्‍या 149 रुपयांच्या प्लान मध्ये आधी रोज 1.5जीबी 4जीबी डाटा मिळत होता, त्याच प्लान मध्ये आता रोज 3जीबी डाटा मिळेल. त्याचप्रमाणे 198 रुपये वाल्या प्लान मध्ये आधी रोज 2जीबी डाटा मिळत होता तर आता या प्लान मध्ये रोज 3.5जीबी डाटा मिळेल.

​जियो च्या 149 रुपये, 349 रुपये, 399 रुपये आणि 449 रुपयांच्या प्लान मध्ये आधी 1.5जीबी डाटा प्रतिदिन मिळत होता त्याऐवजी यात रोज 3जीबी 4जी डाटा मिळेल.

​जियो च्या ​198 रुपये, 398 रुपये, 448 रुपये आणि 498 रुपये वाल्या प्लान मध्ये आधी 2जीबी डाटा प्रतिदिन मिळत होता तर आता या प्लान्स मध्ये 3.5जीबी 4जी डाटा प्रतिदिन मिळेल.

​​रोज 3जीबी डाटा देणार्‍या जियो च्या 299 रुपयांच्या प्लान मध्ये आता ग्राहकांन 4.5जीबी डाटा प्रतिदिन मिळेल.

त्याचप्रमाणे जियो चा 509 रुपयांचा प्लान आधी 4जीबी डाटा प्रतिदिन देत होता त्याजागी यात रोज 5.5जीबी डाटा मिळेल.

रिलायंस जियो 799 रुपयांच्या प्लान मध्ये सर्वात जास्त 5जीबी डाटा प्रतिदिन देत होती, परंतु अपडेट नंतर याच किंमतीत आता रोज 6.5जीबी डाटा मिळेल.

लक्षात असू दे जियो ने हा अपडेट काही दिवसांसाठी उपलब्ध केला आहे. 12 जून पासून 30 जून दरम्यान जे जियो ​यूजर्स या प्लान्स चा रिचार्ज करतील त्यांना हा अतिरिक्त डाटा चा फायदा मिळेल. जियो कस्टमर्स माय जियो अॅप मधून पण आपला जियो नंबर रिचार्ज करू शकतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here