रिलायंस जियो ने टेलीकॉम सर्विस मध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर ब्रॉडबँडच्या क्षेत्रात पण विक्रम करण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘जियो गीगाफाइबर’ लॉन्च केली होती. जियोची गीगाफाइबर सर्विस सध्या फक्त रिलांयस कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध झाली आहे. कंपनीने आता आपल्या या सर्विस साठी एंट्री-लेवल प्लानचे काही ऑप्शन सादर केले आहेत. यामुळे कंपनीला जास्तीत जास्त यूजर्स मिळवण्यास मदत मिळेल.
या नवीन एंट्री-लेवल प्लान अंतर्गत कंपनी यूजर्सना सर्विस घेण्यासाठी 500 रुपयांचे सिक्योरिटी डिपोजिट द्यावे लागेल. याआधी यूजर्सना Jio GigaFiber प्लान घेण्यासाठी 4,500 रुपयांचे सिक्योरिटी डिपोजिट द्यावे लागत होते. पण हा नवीन लो कॉस्ट प्लान काही अटींसह येतो. रिलायंस Jio या प्लान साठी एक एंट्री-लेवल इंटरनेट राउटर देत आहे, जो सिंगल बँड सह येतो. हा रेगूलर ड्यूल बँड फ्रिक्वेंसी राउटरपेक्षा हलक्यातला आहे.
या प्लान मध्ये यूजर्सना 1,100जीबी डेटा प्रति माह मिळेल आणि सोबतच यूजर्सना फ्री लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा लाभ पण मिळेल. तसेच यूजर्सना जियोटीवीच्या मदतीने सर्व टीवी चॅनल्स फ्री मध्ये बघायला मिळतील.
रिलायंस जियोच्या ब्रॉडबँड सर्विस जियो गीगाफाइबर बद्दल बोलायचे तर हि एफटीटीएच म्हणजे फाइबर टू दी होम सर्विस आहे. जियो ने हि सर्विस देशात सादर केली आहे पण हि अजून टेस्टिंग फेज मध्ये आहे. जियोच्या कर्मचाऱ्यांना जियो गीगाफाइबरचे कनेक्शन्स देण्यात आले आहे ज्यमुळे गीगाफाइबरचा स्पीड व क्षमता चांगली पारखता येते.
जियोचा दावा आहे कि जियो गीगाफाइबरचा ट्रायल कंपनीने 10,000 पेक्षा जास्त शहरांत केले आहे. आणि आशा आहे कि येत्या काळात सामन्यांसाठी साठी पण हि सर्विस उपलब्ध होईल. विशेष म्हणजे रिलायंस जियोने जियो गीगाफाइबरचे रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. माय जियो ऍप सोबतच कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रर करता येईल.














