Xiaomi 13 सीरिजची नवी लाँच डेट आली; माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे इव्हेंट ढकलला पुढे

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

Xiaomi 13 series 1 डिसेंबरला लाँच होणार होती परंतु माजी पंतप्रधान Jiang Zemin यांच्या निधनामुळे कंपनीनं हा इव्हेंट पुढे ढकलला होता. आता कंपनीनं आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या लाँचची नवी तारीख सांगितली आहे. Xiaomi 13 series आता 11 डिसेंबरला लाँच होणार आहे. या पावरफुल सीरीजमध्ये Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro 5G हे दोन स्मार्टफोन 11 डिसेंबरला लाँच होऊ शकतात. तसेच शाओमी 13 सीरीजसह MIUI 14, Xiaomi Watch S2 आणि Xiaomi Buds 4 TWS earbuds देखील सादर केले जाऊ शकतात.

Xiaomi 13 series Launch

शाओमी कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी येत्या 11 डिसेंबरला आपली नवी शाओमी 13 सीरीज सादर करणार आहे. या दिवशी ही स्मार्टफोन सीरीज चीनमध्ये लाँच होईल जी नंतर अन्य बाजारांमध्ये एंट्री करू शकते. कंपनीनं या सीरीजमधील स्मार्टफोन्सच्या नावांची माहिती दिली नाही परंतु आशा आहे की 11 डिसेंबरला Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro स्मार्टफोन लाँच होतील. Xiaomi 13 series Launch Event 11 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल जो भारतीय वेळेनुसार 4 वाजून 30 मिनिटांनी असेल. हे देखील वाचा: वनप्लसच्या तोडीच्या स्मार्टफोनवर 25 हजारांची जबरदस्त सूट; फोनमध्ये 12GB RAM आणि वेगवान प्रोसेसर

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स

शाओमी 13 5जी फोन आणि शाओमी 13 प्रो स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केले जाऊ शकतात. हा प्रोसेसर 4नॅनोमीटर फॅब्रिकेशन बनलेला असेल जो हेव्ही प्रोसेसिंग देखील सहज हॅन्डल करू शकतो. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएस तसेच कंपनीचा नवीन मीयुआय 14 देखील दिला जाऊ शकतो.

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

समोर आलेल्या लीक्स नुसार Xiaomi 13 5G मध्ये 6.2-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, तर Xiaomi 13 Pro स्मार्टफोन 6.7-इंचाच्या एलटीपीओ ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. हे दोन्ही मोबाइल फोन पंच-होल डिस्प्ले, 2के रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतात. हे देखील वाचा: 16GB रॅमसह आला दणकट स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसाठी वनप्लसपेक्षा स्वस्त iQOO Neo 7 SE लाँच

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये 50MP Sony IMX989 प्रायमरी सेन्सर मिळू शकतो जो सर्वात मोठा कॅमेरा सेन्सर आहे, त्याचबरोबर 50MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक टेलीफोट लेन्स दिली जाऊ शकते. तसेच Xiaomi 13 5G फोन 50MP Sony IMX800 रियर कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 13 5जी फोन आणि शाओमी 13 प्रो 5जी फोन दोन्हीमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro फोन पावर बॅकअपच्या बाबतीत देखील दमदार असू शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. शाओमी 13 5जी मध्ये 4,700एमएएचची बॅटरी असल्याचं सांगण्यात आलं तर शाओमी 13 प्रो 4,800एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन आयपी68 रेटेड असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here