Samsung Galaxy A04 सीरिज येऊ शकते भारतीय भेटीला; संभाव्य किंमत लीक

सॅमसंग आपल्या ए सीरिजमध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत असते. आता या सीरिजचा विस्तार करण्याची योजना कंपनी बनवत आहे. सॅमसंग दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e भारतात लाँच करू शकते. न्यूज एजेंसी IANS नुसार हे दोन्ही स्मार्टफोन याच आठवड्यात भारतीय बाजारात सादर केले जाऊ शकतात ज्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. पुढे आम्ही गॅलेक्सी ए04 आणि ए04ई च्या इंडिया लाँचसह इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत

Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e या दोन स्मार्टफोनच्या भारतातील लाँचची अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे या दोन्ही हँडसेटच्या किंमतीची माहिती देणं शक्य नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दोन्ही स्मार्टफोन 10 हजार रुपयांच्या आत सादर केले जाऊ शकतात. असं झाल्यास बजेटमध्ये स्मार्टफोन शोधणाऱ्या लोकांसाठी दोन चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

Samsung Galaxy A04 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले
  • एक्सनॉस 850 चिपसेट
  • 8 जीबी पर्यंतच्या रॅम
  • 128 जीबी स्टोरेज

सॅमसंग गॅलेक्सी ए04 स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04 च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर मिळेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए04 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A04e च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
  • हीलियो जी35 चिपसेट
  • 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा
  • 5,000एमएएच बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई पाहता यात 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट मिळतो. तसेच हा मोबाइल फोन रॅम प्लस टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल, त्यामुळे वचुर्अल रॅमच्या माध्यमातून हा फोन 8 जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकेल.

Samsung Galaxy A04e ड्युअल रियरला सपोर्ट करतो ज्यात 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here