Categories: बातम्या

जियोने सादर केला 102 रुपयांचा प्लान, मिळेल अनलिमिटिड फ्री डेटा आणि कॉलिंगचा फायदा

रिलायंस जियोने अमरनाथ यात्रेकरूंसाठी 102 रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. यात्रा लक्षात घेऊन प्लानची वैधता 7 दिवस ठेवण्यात आली आहे. या प्लान मध्ये यूजर्सना कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसचा लाभ मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या प्लान बद्दल सर्वकाही.

रिलायंस जियोचा हा प्लान प्रीपेड यूजर्स साठी आहे. हा प्लान कंपनीने जम्मू कश्मीर सर्कल साठी सादर केला आहे. ग्राहकांना या प्लानने रिचार्ज केल्यानंतर 0.5जीबी अनलिमिटेड डेटा रोज मिळेल. तसेच डेटा संपल्यावर 64केबीपीएस स्पीडने इंटरनेट वापरता येईल.

सोबतच यूजर्सना अनलिमिटिड नॅशनल आणि लोकल कॉलिंगची सुविधा पण मिळेल. तसेच ग्राहकांना प्रतिदिन 100 एसएमएस पण फ्री मिळतील. हा प्लान फक्त नॉन-प्राइम मेंबर्स साठी आहे.

जम्मू कश्मीर मध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे देशभरातून आलेल्या यात्रेकरूंचे फक्त पोस्ट-पेड कनेक्शनच चालतात. दुसऱ्या राज्यातून आलेल्या प्रवाशांचे प्रीपेड कनेक्शन राज्यात बंद पडतात. त्यामुळे कोणत्याही टेलीकॉम कंपनीच्या प्री पेड ग्राहकांना आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठीजम्मू कश्मीर मधून नवीन कनेक्शन घ्यावे लागते. प्रवासी कनेक्शन तर घेतात पण याचा वापर फक्त यात्रेतच करतात त्यामुळे हा सौदा महागात पडतो.

रिलायंस जियोचा 7 दिवसांचा हा प्रीपेड प्लान अमरनाथ यात्रेकरूंसाठी योग्य आहे. ज्यात फक्त 102 रुपयांमध्ये यात्री फक्त यात्राकाळात आपल्या कुटुंबाशी संपर्क करू शकतीलआणि 7 दिवसांची व्हॅलिडिटी संपताच हा आपोआप संपेल.

Published by
Siddhesh Jadhav