जियो ची नवीन आॅफर 299 रुपयांमध्ये 126जीबी 4जी डेटा, जाणून घ्या संपूर्ण प्लान आणि कधी पर्यंत आहे वैध

जियो नेहमीच आपल्या धमाकेदार आॅफर मुळे यूजर्सना आकर्षित करत असते आणि यात दुमत असण्याचे कारण नाही की ​रिलायंस​ जियो मुळे आज भारतीय मोबाइल यूजर्स जगात सर्वात कमी किंमतीत कॉलिंग आणि डेटा चा वापर करत आहेत. कंपनी ने सुरवातीला आपली सेवा मोफत दिली आणि नंतर सर्वात कमी किंमतीत 4जी सेवा दिली. आता पण कंपनी कडून आॅफर्स थांबल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी डेली डेटा लिमिट 1.5जीब वरून वाढवून 3जीबी करण्यात आली होती. तसेच रिलायंस जियो ला दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून आज कंपनी ने एक नवीन आॅफर सुरू केली आहे. या आॅफर अंतर्गत तुम्ही 399 रुपयांचा प्लान फक्त 299 रुपयांमध्ये मिळवू शकता.

कसा आहे प्लान
आपल्या दुसर्‍या वाढदिवसाच्या निमित्ताने कंपनी ने फोनपे सोबत मिळून या सेवेची सुरवात केली आहे ज्यात जियो यूजर्सना 399 रुपयांच्या प्लान मध्ये 100 रूपयांची सूट मिळेल. कंपनी अशी माहिती दिली आहे की त्यांचा जो सर्वात जास्त विकला जाणारा प्लान आहे, तो 100 रुपये प्रति माह मध्ये मिळेल. अर्थात 299 रुपयांमध्ये आता तुम्ही 3 महीने जियो सर्विस वापरू शकता. त्याचबरोबर जियो ने अशी माहिती दिली आहे की दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनी ने प्रत्येकाला 16जीबी ची कॉम्पलिमेंटरी आॅफर दिली आहे.

कसा घ्यावा सेवेचा लाभ
लक्षात घ्या जरी कंपनी 399 रुपयांचा प्लान 299 रुपयांमध्ये देत असली तरी तुम्हाला रिचार्ज करताना 399 रुपयांचा प्लान निवडावा लागेल. रिचार्ज करताना तुम्हाला दोन वाउचर्स मध्ये 100 रूपयांची सूट मिळेल.

रिलायंस जियो ची ही नवीन आॅफर मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला माय जियो अॅप वर जाऊन 399 रुपयांचा प्लान निवडावा लागेल.

त्यानंतर खाली बाय चा आॅप्शन येईल. त्यावर क्लिक करताच 50 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट तुम्हाला मिळेल.

आता खाली तुम्हाला पेमेंटचे आॅप्शन दिसतील. तिथे फोनपे ची निवड करा.

आता तुम्ही तुमच्या फोनपे अकाउंट मध्ये लॉगिन करून पेमेंट करू शकता. पेमेंट करताच 50 रुपयांचा कॅश बॅक तुमच्या माय जियो अप मध्ये येईल.

आॅफर ची वैधता
​रिलायंस जियो ची ही आॅफर मर्यादित काळासाठी वैध आहे. ही आॅफर आज पासून सुरू होत आहे तर 21 सप्टेंबरला संपेल.

399 च्या प्लान मध्ये मिळणार्‍या आॅफर्स
रिलायंस जियो चा 399 रूपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधते सह येतो. यात तुम्हाला रोज 1.5जीबी 4जी डेटा मिळेल अर्थात दर महिना 42जीबी 4जी डेटा. कंपनी चे म्हणेन आहे की आम्ही 100 रुपये प्रति माह या दराने यूजर्सना 42जीबी डेटा देण्यात येत आहे. जियोच्या या प्लान मध्ये कोणत्याही प्रकारची लोकल आणि नेशनल कॉलिंग फ्री असेल. इतकेच नव्हे तर प्लान मध्ये तुम्हाला रोज 100 एसएमएस मिळतील. तुम्हाला तर माहितीच आहे की रिलायंस​ जियो मध्ये रोमिंग सुरवातीपासून मोफत आहे आणि त्यामूळे या प्लान मध्ये पण रोमिंग शुल्क द्यावे लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here