6,000 रुपयांनी कमी झाली तीन कॅमेरा असेलल्या सॅमसंग गॅलेक्सी ए7, नवीन किंमत जाणून घ्या

सॅमसंग ने नुकतीच गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ ची किंमत 2,000 रुपयांपर्यंत कमी केली होती. आता कंपनी ने पुन्हा एकदा आपल्या अजून एका हॅन्डसेटची किंमत कमी केली आहे, ज्यात गॅलेक्सी ए7 चा समावेश आहे. या डिवाइसच्या दोन्ही वेरीएंटची किंमत कमी करून कंपनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देत आहे. सॅमसंगच्या आधी शाओमी वीवो, मोटो आणि असूस ने पण आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.

स्मार्टफोनच्या कमी झालेल्या किंमतीची माहिती दिल्ली मधील मनोज टेलीकॉम रिटेलर संजय गोस्वामी यांनी 91मोबाईल्सला दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए7 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला होता. ज्यांची किंमत क्रमश: 23,990 रुपये आणि 28,990 रुपये होती. आता या वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज वेरिएंट 18,990 रुपये व 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याआधी पण हा डिवाइस कमी किंमतीती सेल साठी उपलब्ध केला गेला होता पण यावेळी प्राइस कट कायम ठेवण्यात येणार आहे.

गॅलेक्सी ए7 चे स्पेसिफिकेशन पाहता फोन मध्ये 3 कॅमेरा सेंसर्स आहे. एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चरला सपोर्ट करतो, दुसरा 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तिसरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर आहे. ग्लास डिजाइन मध्ये उपलब्ध हा फोन कंपनीने 6.0-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. तसेच याचा फिंगरप्रिंट स्कॅनर साइड पॅनल मध्ये पावर बटण वर देण्यात आला आहे.

गॅलेक्सी ए7 चा सेल्फी कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे. हा फोन एक्सनोस 7885 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. मेमरी वेरियंट सोबत रॅम पण वेगळा आहे. 64जीबी मेमरी सोबत 4जीबी रॅम तर 128जीबी स्टोरेज सह 6जीबी रॅम आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे. गॅलेक्सी ए7 (2018) डुअल सिम 4जी फोन आहे जो एनएफसी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,300एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग ने आपला हा दमदार फोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड व पिंक कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here