84 दिवसांची वैधता असलेला स्वस्त प्लॅन कोणाचा? अशी आहे Jio, Airtel, Vi आणि BSNL च्या पॅक्सची किंमत

Airtel, Jio आणि Vi या प्रमुख कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिवसेंदिवस एकापेक्षा एक रिचार्ज प्लॅन्स सादर करत आहेत. तसेच सरकारी कंपनी BSNL देखील कमी किंमतीत शानदार प्लॅन सादर करण्याच्या शर्यतीत सहभाग घेत आहे. या सर्व कंपन्यांकडे विविध रिचार्ज प्लॅन आहेत. हे प्लॅन अनेक प्रकारची वैधता, डेली डेटा लिमिट आणि अनेक अन्य लाभांसह येतात. परंतु, जर तुम्ही 84 दिवसांची वैधता असलेला रिचार्ज पॅक शोधत असाल तर इथे आम्ही तुमच्यासाठी सर्व कंपन्यांच्या 84 दिवसांची वैधता असलेल्या बेस्ट आणि सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची माहिती देत आहोत. म्हणजे तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल.

84 Days Validity Recharge Plan

  • Jio Rs 395 Plan
  • Airtel Rs 455 Plan
  • Vodafone Idea 459 Plan
  • BSNL 599 Plan

जियोचा 395 रुपयांचा प्लॅन

Reliance Jio चा हा सर्वात स्वस्त 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे. या जियो प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. हा प्लॅन तुम्हाला 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह मिळतो. तसेच रिचार्जमध्ये एकूण 6 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह 1000 SMS पाठवण्याची सुविधा दिली जाते. तसेच जियो अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे.

एयरटेलचा 455 रुपयांचा प्लॅन

जवळपास 3 महिने चालणारा एयरटेलचा हा रिचार्ज 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. Airtel 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहको एकूण 6 जीबी डेटा मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 900 SMS ची सुविधा दिली जाते. इतकेच नव्हे तर या रिचार्ज प्लॅनमध्ये Prime Video Mobile Edition, Free Hello tunes, Wynk म्यूजिकचं सब्सस्क्रिप्शन फ्री मिळतं.

वोडाफोन आयडियाचा 459 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या वोडाफोन-आयडियाच्या 459 रुपयांचा प्लॅनमध्ये एकूण 6 जीबी डेटा लिमिट मिळते. युजर्स हा 6 जीबी डेटा एका दिवसात वापरू शकतात किंवा 84 दिवसांपर्यंत डेटा वापरता येईल. तसेच 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 1000 SMS मिळतात. प्लॅनमध्ये Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिलं जातं.

बीएसएनएलचा 599 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलकडे देखील 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आहे ज्याची किंमत अन्य कंपन्यांपेक्षा थोडी जास्त आहे. कंपनी प्लॅनची किंमत 599 रुपये ठेवली आहे. परंतु बेनिफिट्स देखील सर्व कंपन्यांपेक्षा जास्त देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 5GB Data मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याची सुविधा मिलती आहे. तसेच तुम्हाला रोज 100 फ्री मेसेज देखील मिळतात. कंपनी ग्राहकांना Zing App चं सब्सक्रिप्शन मोफत देत आहे.

निष्कर्ष: Jio कडे 84 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त प्लॅन आहे. परंतु बेनिफिट्सच्या बाबतीत सरकारी कंपनीनं BSNL नं बाजी मारली आहे. कारण बीएसएनएलच्या ग्राहकांना एकूण 420 जीबी डेटा मिळतो. परंतु हा प्लॅन जियोच्या तुलनेत 240 रुपये महाग आहे. तसेच, बीएसएनएल प्लॅन सर्व राज्यांमध्ये सामान बेनिफिट्स देत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here