निमित्त कोणतेही असो रिलायंस जियो ते सोडत नाही. प्रत्येक संधीचा फायदा घेऊन आपल्या यूजर्सना कंपनी काही ना काही आॅफर्स देत असते. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे आणि यावेळी पण कंपनी आपल्या यूजर्स साठी खास भेट घेऊन आली आहे. कंपनीने जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड लॉन्च केला आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही खूप कमी किंमतीती जियो फोन रिचार्ज सोबतच विकत घेऊ शकता किंवा कोणलाही गिफ्ट करू शकता.
रिलायंस जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया, रिलायंस डिजिटल स्टोर आणि रिलायंस फ्रेश सहित इतर कंपनी स्टोर वर उपलब्ध आहे याची किंमत 1,095 रुपये आहे. हा तुम्ही अमेझॉन व्यतिरिक्त रिलायंस डिजिटल स्टोर वरून पण वापरू शकता. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही कोणताही जुना फोन देऊन 1,500 रुपयांचा नवीन जियोफोन घेऊ शकता ज्याची किंमत फक्त 501 रुपये असेल. इतकेच नव्हे तर गिफ्ट कार्ड सोबत जियो फोन वर 594 रुपयांचा स्पेशल प्रीपेड प्लान वाला कूपन पण मिळेल ज्यात भरपूर डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स आहेत.
रिलायंस जियो च्या 6 महिन्यांच्या या प्लानची वैधता 6 महीने अर्थात 180 दिवस आहे आणि यात तुम्हाला रोज 500 एमबी 4जी डेटा मिळेल. कंपनी 180 दिवसांत 90जीबी 4जी डेटा देत आहे. तसेच जियो च्या इतर प्लान प्रमाणे या प्लान मध्ये पण अनलिमिटेड कॉलिंग सेवा मोफत आहे. सोबतच नॅशनल रोमिंग पण फ्री आहे. तसेच कंपनी जुना फोन एक्सचेंज केल्यास 6जीबी अतिरिक्त 4जी डेटा देता आहे.
विशेष म्हणजे साल 2017 मध्ये रिलायंस ने 1,500 रुपयांचा 4जी फीचर फोन सादर केला होता. या फोन साठी कंपनीने 49 रुपयांचा मासिक, 153 रुपयांचा मासिक आणि 594 रुपयांचा सहामाही प्लान सादर केला आहे. तसेच यावर्षी कंपनी ने जियोफोन 2 सादर केला आहे जो क्वर्टी कीपॅड सह उपलब्ध आहे ज्याची किंमत 2,999 रुपये आहार. या फोन मध्ये डुअल सिमचा वापर करता येतो तर जियोफोन मध्ये एकच सिमचा वापर करता येतो. जियोफोन 2 साठी हे गिफ्टकार्ड वैध नाही.














