आपल्या स्मार्टफोन मध्ये खास टेक्नोलॉजीचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करणारी कंपनी Vivo अनेक दिवसांपासून भारतातील स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. पुन्हा एकदा कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. 91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडून याची माहिती मिळाली आहे कि यावेळी कंपनीने Vivo V15 आणि Vivo Y17 च्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनी याआधी पण Vivo V15 ची किंमत कमी केली आहे. तर Y17 ची किंमत पहिल्यांदा कमी झाली आहे. विशेष म्हणजे Y17 स्मार्टफोन कंपनीने गेल्याच महिन्यात एप्रिलच्या अखेरीस लॉन्च केला होता.
या असतील नवीन किंमती
सर्वात आधी पॉप-अप सेल्फी आणि 3 रियर कॅमेरा असणाऱ्या Vivo V15 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनी याआधी डिवाइस 21,990 रुपयांमध्ये सेल करत होती. आत याच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर फोनची किंमत 19,990 रुपये झाली आहे.
Vivo Y17 बद्दल बोलायचे तर कंपनीने हा गेल्या महिन्यात भारतीय बाजारात 17,990 रुपयांमध्ये आणला होता. पण एकाच महिन्यात फोनच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर फोनची किंमत 17,990 रुपये झाली आहे.
वीवो वी15 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वी15 मध्ये 6.53-इंचाची एलसीडी स्क्रीन आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोबतच फोन मध्ये मीडियाटेक हेलियो पी70 प्रोसेसर आणि 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई-बेस्ड फनटच ओएस आणि 4,000एमएएच बॅटरी सह येतो. फोटोग्राफी साठी हँडसेट मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मागे 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच यात 8-मेगापिक्सल वाइड-एंगल शूटर आणि 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग लेंस आहे.
वीवो वी15 प्रो बद्दल बोलायचे तर कंपनीने हा ग्लास फिनिश मध्ये सादर केला होता आणि समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनीने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39-इंचाची फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर करण्यात आला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.
हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.
वीवो वाई17 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वाई17 मध्ये 6.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13-मेगापिक्सल एफ/2.2 प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल एफ/2.2 सुपर वाइड-एंगल थर्ड सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 20-मेगापिक्सल शूटर एफ/2.0 अपर्चर सह मिळतो. Vivo Y17 एंडरॉयडच्या सर्वात नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.
















