Samsung बद्दल अशी बातमी आहे कि कंपनी दोन नवीन स्मार्टफोन्स Samsung Galaxy A02 आणि Samsung Galaxy M02 वर काम करत आहे. हे दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स वर पण समोर आले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा पण दावा केला जात आहे कि हे दोन्ही एकच फोन असेल जो वेगवेगळ्या बाजारांमध्ये गॅलेक्सी ए02 आणि गॅलेक्सी एम02 नावाने लॉच होऊ शकतो. पण एका ताज्या सर्टिफिकेशन्स मध्ये Samsung Galaxy A02 ची नवीन माहिती समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि हा फोन 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.
Samsung Galaxy A02 लॅटिन अमेरिकेच्या CPQD वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर हा फोन SM-A025M/DS मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए02 मध्ये HQ-50S मॉडेल नंबर असलेली बॅटरी दिली जाईल. विशेष म्हणजे हा बॅटरी मॉडेल TUV Rheinland वर लिस्ट झाला आहे जिथे याची कपॅसिटी 5,000एमएएच सांगण्यात आली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए02 स्मार्टफोन पण 5,000एमएएच बॅटरी सोबतच बाजारात येईल.
असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयुआय सह चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.
हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री
लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. अश्याप्रकारे पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. आशा आहे कि हा फोन लो बजेट मध्ये लॉन्च होईल ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.
Samsung Galaxy A12
गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक फोन काही दिवसांपूर्वी लीक मध्ये समोर आला आहे जो Samsung Galaxy A12 नावाने लॉन्च होईल. लीकनुसार हा फोन एलसीडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला जाईल. रिपोर्टनुसार Samsung Galaxy A12 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कॅमेरा प्लेसमेंटची माहिती समोर आली नाही पण रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि फोनच्या बॅक पॅनल वरील सेंसर्स मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर पण फोनच्या बॅक पॅनल वरच दिला जाईल.
गीकबेंच वर हा फोन अँड्रॉइड 10 ओएस आणि मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 3 जीबी रॅम असल्याची माहिती मिळाली होती. सॅमसंग गॅलेक्सी ए12 बद्दल सांगितले आहे कि याआधीचा पहिला वर्जन गॅलेक्सी ए11 फक्त 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च झाला होता तर गॅलेक्सी ए12 मध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेले दोन स्टोरेज वेरिएंट दिले जाऊ शकतात. सॅमसंगच्या या आगामी फोन मध्ये 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच हा फोन black, white, red आणि blue कलर सह टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.















