Samsung Galaxy A12 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट

सॅमसंग आपल्या लोकप्रिय गॅलेक्सी A सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ए-सीरीजचा हा फोन कंपनी गॅलेक्सी ए12 च्या नावाने सादर केला जाऊ शकतो. टेक वेबसाइट MySmartPrice द्वारे माहिती देण्यात आली आहे कि Samsung Galaxy A12 सर्टिफिकेशन वेबसाइट NFC वर स्पॉट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये गॅलेक्सी A12 च्या कोणत्याही फीचरची माहिती देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या काही लीक्सनुसार सॅमसंगचा हा फोन गॅलेक्सी A11 का अपग्रेडेड वर्जन असू शकतो.

या सर्टिफिकेशन नंतर स्पष्ट झाले आहे कि हा फोन नियर फील्ड कम्युनिकेशन सह येईल. या टेक्नॉलजीच्या मदतीने दोन डिवाइसेज मध्ये वायरलेस कम्युनिकेशन करता येईल. एनएफसीच्या माध्यमातून यूजर कंपॅटिबल डिवाइस सह कॉन्टॅक्टलेस पेमेंट पण करू शकतात.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy M12/ F12 ची लाइव इमेज आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि सॅमसंगने गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन Galaxy A12 वर काम सुरु केले आहे आणि हा फोन SM-A125F मॉडेल नंबर सह बाजारात येईल. फोनची माहिती देण्यासोबतच रिपोर्ट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए12 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला गेला आहे.

रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन मध्ये हा फोन एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे समजले आहे ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. रिपोर्टनुसार हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला पण सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर

Samsung Galaxy A12 बद्दल सांगितले जात आहे कि याआधीच वर्जन गॅलेक्सी ए11 फक्त 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च झाला होता तर गॅलेक्सी ए12 मध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेले दोन स्टोरेज वेरिएंट दिले जाऊ शकतात. सॅमसंगच्या या आगामी फोन मध्ये 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरी असल्याचे बोलले जात आहे तसेच हा फोन black, white, red आणि blue कलर सह टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A11

सॅमसंग गॅलेक्सी ए11 लुक आणि डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए21 सारखा आहे. हा पण पंच-होल डिस्प्ले वर सादर झाला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. सॅमसंगने आपला हा फोन 6.4 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए11 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची प्राइमरी वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here