मोबाईल मार्केट मध्ये वेगाने लॉन्च केल्या जाणाऱ्या स्वस्त 5G फोन्स मध्ये लवकरच सॅमसंगच्या एका नवीन फोनचे नाव येणार आहे. आशा आहे कि सॅमसंग भारतात पुढल्या वर्षीच्या मध्यात Samsung Galaxy A22 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकते. इंडियन मार्केट सोबतच हा फोन इतर दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये पण सादर केला जाऊ शकतो. हा फोन खास असण्याचे महत्वाचे कारण असे आहे कि डिवाइस भविष्यात सर्वात किफायती 5जी हँडसेट पैकी एक असेल. सॅमसंग गॅलेक्सी ए22 5जी फोन कंपनीच्या Galaxy A21 चा सक्सेसर असल्याचे बोलले जात आहे.
नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये सॅमसंग मार्केट मधील स्वस्त 5G फोन्सना तगडे आव्हान सादर करण्याची तयारी करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी लीक समोर आला होता कि कंपनी Galaxy A32 5G फोन मार्केट मध्ये आणू शकते, ज्याची किंमत कथित सॅमसंग गॅलेक्सी ए22 5जी च्या तुलनेत थोडी जास्त असू शकते.
हे देखील वाचा : बॉक्स मधून iPhone काढून ठेवत होते वीट आणि साबण, एक-एक करून चोरले 1 कोटीचे 78 फोन
कोरियन पब्लिकेशन Daum.net च्या एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Samsung Galaxy A22 5G साल 2021 च्या उत्तरार्धात लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए22 5जी ची किंमत KRW 200,000 (जवळपास 13,300 रुपये) असू शकते.
Samsung Galaxy A32 5G
Samsung Galaxy A32 5G च्या नावावरून समजते कि हा सॅमसंगचा 5जी कनेक्टिविटी असलेला स्मार्टफोन असेल जो ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतगर्त सादर केला जाईल. गॅलेक्सी ए32 5जी ची माहिती गॅलेक्सीक्लब वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार सॅमसंगने आपल्या नवीन 5जी फोन वर काम सुरु केले आहे आणि Galaxy A32 5G डेवलेपमेंटच्या सुरवातीच्या टप्प्यावर आहे. लीकनुसार गॅलेक्सी ए32 5जीच्या माध्यमातून सॅमसंग कंपनी 5जी डिवायसेज कमी किंमतीत आणण्याचे प्रयत्न करत आहे.
हे देखील वाचा : Exclusive: लॉन्चच्या आधी समोर आली Samsung Galaxy S21, S21+ आणि S21 Ultra ची किंमत
गॅलेक्सी ए32 5जी बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा सॅमसंगचा 5जी सपोर्ट असलेला बजेट स्मार्टफोन असेल. या फोनचा मॉडेल नंबर रिपोर्ट मध्ये SM-A326 सांगण्यात आला आहे. लीकनुसार Samsung Galaxy A32 5G मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण असेल. फोन मध्ये किती कॅमेरा सेंसर असतील हे अजून स्पष्ट झाले नाही. लक्षात असू द्या कि मागे Samsung Galaxy A42 5G पण 5,000एमएएच बॅटरी सह दिसला होता.














