Samsung लवकरच आपल्या दमदार गॅलेक्सी एस21 सीरीज मध्ये तीन नवीन फोन्स सादर करणार आहे. आता पर्यंत समोर आलेल्या लीकनुसार सॅमसंग 14 जानेवारीला Galaxy S21 सीरीज सादर करू शकते. पण कंपनीने अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. आता टिप्स्टर इशान अग्रवालने 91mobiles ला एस21 सीरीज मध्ये येणाऱ्या तिन्ही हँडसेट Samsung Galaxy S21, S21+, and S21 Ultra च्या किंमतीची माहिती दिली आहे.
अशी असेल किंमत
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एस21 च्या 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 849 यूरो (जवळपास 76,000 रुपये) असेल. तर, गॅलेक्सी एस21+ चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,049 यूरो (जवळपास 94,500 रुपये) व 256 जीबी स्टोरेज वेरियंट 1,099 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी एस21 अल्ट्रा चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,399 यूरो (जवळपास 1.26 लाख रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन
रेंडर्स पण झाले लीक
किंमती व्यतिरिक्त टिप्स्टरने अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी एस21+ चे नवीन रेंडर्स पण जारी केले आहेत. या रेंडर्स वरून फोनच्या फ्रंट व रियर डिजाइन सोबतच माहिती मिळाली आहे कि फोन्स तीन कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. इशान अग्रवालनुसार, गॅलेक्सी एस21 आणि गॅलेक्सी एस21+ च्या किंमती सॅमसंग गॅलेक्सी एस20 आणि गॅलेक्सी एस20+ च्या तुलनेत कमी करण्यात आल्या आहेत. तसेच गॅलेक्सी एस21 अल्ट्रा कंपनीच्या गॅलेक्सी एस20 अल्ट्रा पेक्षा महाग असेल. तसेच दुसऱ्या ट्वीट मध्ये इशानने एक फोटो शेयर केला आहे ज्याबाबत दावा केला गेला आहे कि हा सॅमसंग गॅलेक्सी एस21+ च्या कवरचा फोटो आहे. या तस्वीर मध्ये फोन वर तीन कॅमेरा मॉड्यूल आणि फ्लॅश दिसला होता.
डिजाइन
याआधी Blass ने शेअर केलेल्या Samsung Galaxy S21, Galaxy S21 + आणि Galaxy S21 Ultra चे लीक झालेल्या रेंडर वरून तिन्ही हँडसेटच्या संपूर्ण डिजाइनचा खुलासा झाला होता. लीक झालेले रेंडर सांगत आहेत कि सॅमसंग गॅलेक्सी एस 21 चार कलर ऑप्शन-गोल्ड, पर्पल, व्हाइट आणि ब्लॅक मध्ये येईल. हँडसेट मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप सह सादर केला जाईल. तसेच फ्रंटला मध्यभागी पंचहोल-डिजाइन सह एक फ्लॅट डिस्प्ले आणि उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन असेल. तर गॅलेक्सी एस 21 प्लस मध्ये गॅलेक्सी एस 21 सारखी डिजाइन असेल दोन्ही हँडसेटच्या मध्ये महत्वपूर्ण फरक स्क्रीन आकार आणि बॅटरीच्या क्षमतेचा असेल.
हे देखील वाचा : Samsung पासून Xiaomi पर्यंतचे हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, बघा संपूर्ण यादी
स्पेसिफिकेशन्स
गॅलेक्सी S21 अल्ट्रा मध्ये कथितरित्या एक अतिरिक्त कॅमेरा सेंसर आणि मागे एक लेजर ऑटोफोकस सेंसर सह येईल. आधीच्या लीकच्या आधारावर बोलायचे झाले तर यात 10MP 10x सुपर-टेलीफोटो झूम लेंस, 108MP मुख्य सेंसर, 12MP अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP 3x टेलीफोटो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा कडून अपेक्षा करता येईल कि हा एका मोठ्या बॅटरी सह येईल. खासकरून गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा इतर मॉडेल्सच्य विपरीत घुमवदार डिस्प्ले पॅनल सह येईल.















