सॅमसंग आपल्या गॅलेक्सी ए-सीरीज मध्ये लवकरच दोन नवीन फोन्स Samsung Galaxy A52 5G आणि Galaxy A72 5G नावाने सादर करू शकते. आशा आहे कि कंपनीचे हे अपकमिंग 5जी फोन Q1 2021 मध्ये मिड-रेंज प्राइस टॅग सह येतील. सध्या लॉन्च डेटची माहिती समोर आली नाही. तर 91mobiles ने विशेष करून खुलासा केला होता कि गॅलेक्सी A52 चे उत्पादन भारतात सुरु झाले आहे आणि आम्ही या डिवाइसचे पॅनल फोटोज पण शेअर केले होते. आता फेमस टिपस्टर इवान ब्लास उर्फ @eveleaks ने गॅलेक्सी ए72 आणि गॅलेक्सी ए52 चे ऑफिशियल फोटोज शेयर केले आहेत.
Samsung Galaxy A52 ची डिजाइन
गॅलेक्सी ए52 चा लुक पाहता यात पुढ्याच्या बाजूस इनफिनिटी-ओ डिस्प्ले असेल. तर फोनच्या उजव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटन दिला जाईल. फोन मध्ये खालच्या बाजूला टाइप-सी पोर्ट असेल. सिक्यॉरिटीसाठी हँडसेट मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. हँडसेटचे डाइमेंशन 159.9 x 75.1 x 8.4 मिलीमीटर असेल.
Samsung Galaxy A72 ची डिजाइन
Samsung Galaxy A72 ची डिजाइन पण Galaxy A52 प्रमाणेच असेल. फ्रंटला दोन्ही फोन एक सारखे असतील. तसेच फोनच्या मागे Galaxy A52 प्रमाणेच आयताकृती क्वाड कॅमेरा सेटअप असेल. त्याचबरोबर फोनच्या उजवीकडे पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर असेल.
हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी सेग्मेंट मध्ये Samsung चा पुढचा डाव तयार, 2 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त मोठा डिस्प्ले असलेला Galaxy M02
किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत €369 (जवळपास 32,800 रुपये) पासून सुरु होईल. तर सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 256 जीबी वर्जनची किंमत € 429 (जवळपास 38,100 रुपये) असू शकते. त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी A52 5G च्या किंमती क्रमशः € 449 (जवळपास 39,800 रुपये) आणि € 509 (जवळपास 45,200 रुपये) असतील. तसेच, सॅमसंग गॅलेक्सी A72 च्या 128GB वेरिएंटची किंमत € 449 (जवळपास 39,800 रुपये) आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत € 509 (जवळपास 45,200 रुपये) सांगण्यात आली होती.
सॅमसंग गॅलेक्सी A52 आणि गॅलेक्सी A72 चे स्पेसिफिकेशन
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Samsung Galaxy A52 मध्ये 6.5-इंचाचा एफएचडी + एएमओएलईडी डिस्प्ले असेल. या डिवाइसच्या 5G वर्जन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC आणि 4G वेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 720G असू शकतो. फोन Android 11 OS OneUI 3.0 कस्टम स्किन सह दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी A52 मध्ये 64MP प्राइमरी सेंसरसह मागे क्वाड-कॅमेरा असेल जो अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, डेप्थ सेंसर आणि मॅक्रो यूनिट सह येईल.
हे देखील वाचा : Xiaomi ची मोठी कामगिरी, आता हवेतून होईल स्मार्टफोन चार्ज, आली नवीन टेक्नॉलजी
सॅमसंग गॅलेक्सी A72 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले असू शकतो. रियर-कॅमेरा सेटअप मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस, 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असू शकतो. 4जी मॉडेल स्नॅपड्रॅगॉन 720 SoC सह 8GB रॅम सह येऊ शकतो. गॅलेक्सी A72 Android 11 OS वर चालेल.















