Xiaomi ची मोठी कामगिरी, आता हवेतून होईल स्मार्टफोन चार्ज, आली नवीन टेक्नॉलजी

गेल्या काही वर्षांमध्ये टेक विश्व वेगाने बदलत आहे आणि या वेगाने बदलणाऱ्या टेक विश्वात आपण अनेक अद्भुत टेक्नोलॉजीज पण बघितल्या आहेत. अशीच एक नवीन आणि अनोखी टेक्नोलॉजी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने सादर केली आहे. शाओमीने एक पाऊल पुढे जात ‘एयर चार्ज टेक्नोलॉजी’ ची घोषणा केली आहे, जी खरा वायर-फ्री चार्जिंग एक्सपीरियंस युजर्सना देईल. नवीन टेक्नोलॉजी एकसाथ अनेक डिवाइसेजना कोणत्याही वायरलेस स्टँडवर न ठेवता किंवा केबलविना चार्ज करेल.

XIAOMI नुसार एमआय एयर चार्ज सध्या फक्त डेमो स्टोर मध्ये ठेवण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात हि डिवाइससाठी कधी येईल हे आता सांगता येणार नाही.

कोणत्याही तारेची गरज नाही

हि टेक्नोलॉजी आल्यानंतर वायरलेस चार्जिंग पण जुनी होईल कारण वायरलेस फोन चार्ज करण्यासाठी पण चार्जिंग पॅडची गरज असते. आता फोन हवेतून चार्ज करणारी टेक्नोलॉजी आल्यानंतर स्मार्टफोन कोणत्याही डिवाइसशी कनेक्ट करण्याची आवश्यकता नसेल.

शाओमीच्या Remote Charging Technology’ (Mi Air Charge) बद्दल शाओमीने सांगितले आहे कि कंपनीची पेटंटेड Mi एयर चार्ज टेक्नोलॉजी एक खास सेल्फ डिवेलप्ड टावर किंवा बॉक्स सारख्या डिवाइसचा वापर करते.

फोनला मिळेल सपोर्ट

याची घोषणा करताना कंपनीने सांगितले आहे कि रिमोट चार्जिंग टेक्नोलॉजी फक्त स्मार्टफोनला सपोर्ट करते. पण भविष्यात हि टेक्नोलॉजी स्मार्ट वॉच, ब्रेसलेट्स आणि इतर डिवाईसेसना पण सपोर्ट करेल.

असा चार्ज होईल फोन

या टेक्नोलॉजीद्वारे थेट स्मार्टफोन्सना मिलीमीटर वेव्स पोहोचतील आणि या वेव्स इलेक्ट्रिक पावर मध्ये बदलून फोन चार्ज करतील. चार्जिंग टावर मध्ये पाच फेज-डिटेक्शन अँटेना आहेत, जे कोणत्याही स्मार्टफोन किंवा डिवाइसची पोजीशन बघून तो चार्ज करतात. बोलले जात आहे कि मिलीमीटर वेव्स पाठवण्यासाठी चार्जिंग डिवाइस मध्ये 144 बीमफॉर्मिंग अँटेना आहेत.

वर सांगितल्याप्रमाणे कंपनी हि टेक्नॉलॉजी मार्केट मध्ये कधी घेऊन येईल याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. पण, एवढे मात्र निश्चित आहे कि ज्या पण डिवाइससह हि टेक्नोलॉजी दिली जाईल तो प्रीमियम कॅटेगरीचा असेल. या चार्जिंग टेक्नोलॉजीसाठी उत्साहित युजर्सना थोडी वाट बघावी लागू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here