Samsung Galaxy A55 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधी लीक, येथे वाचा पूर्ण माहिती

सॅमसंग कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे ज्याला Samsung Galaxy A55 5G नावाने मार्केटमध्ये आणले जाऊ शकते. येत्या काही दिवसांमध्ये हा मोबाईल अनेक सर्टिफिकेशन्स साइटवर आला आहे तसेच आता बाजारात येण्याच्या अगोदर याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स तसेच किंमत पण इंटरनेटवर लीक झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए 55 5 जी फोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A55 5G (किंमत)

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोन दोन व्हेरीएंट मध्ये लाँच केला जाईल. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM दिली जाऊ शकते ज्याची किंमत 449 euros सांगण्यात आली आहे. ही किंमत 40,300 रुपयांच्या आसपास आहे. फोनचे मोठे व्हेरिएंट 8GB RAM सह मार्केटमध्ये आणले जाऊ शकते, ज्याची किंमत 499 euros सांगण्यात आली आहे.ही किंमत भारतीय चलनानुसार 44,800 रुपयांच्या आसपास आहे.

लीकनुसार जागतिक मार्केटमध्ये हा फोन Navy, Ice Blue, White आणि Purple कलरमध्ये लाँच होईल. सॅमसंग गॅलेक्सी ए55 ची जी किंमत लीक झाली आहे ती जर्मनीची आहे. तसेच भारतीय बाजारात हा मोबाईल फोन जागितक किंमतीपेक्षा कमी किंमतीत लाँच होईल.

Samsung Galaxy A55 5G (स्पेसिफिकेशन्स)

  • 6.6″ 120Hz AMOLED Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Samsung Exynos 1480
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 25W 5,000mAh Battery
  • स्क्रीन: सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला 6.6 इंचाच्या मोठ्या स्क्रीनवर लाँच केले जाऊ शकते जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार मोबाईलमध्ये अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला जाईल ज्यावर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी असणार आहे.
  • प्रोसेसर: Samsung Galaxy A55 5G फोनला अँड्रॉइड 14 वर लाँच केले जाऊ शकते ज्यासोबत वनयुआय 6.1 पाहायला मिळू शकते. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.75 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालणारा या ब्रँडचा एक्सीनोस 1480 आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • मेमरी: लीकनुसार हा सॅमसंग स्मार्टफोन 6जीबी रॅम तसेच 8 जीबी रॅमसह मार्केटमध्ये एंट्री घेईल. या व्हेरिएंट्समध्ये 128 जीबी स्टोरेज तसेच 256 जीबी स्टोरेज पाहायला मिळू शकते.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy A55 5G फोनला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह मार्केटमध्ये आणले जाऊ शकते.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार गॅलेक्सी ए55 च्या बॅक पॅनलवर ओआयएस टेक्नॉलॉजी असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर मिळेल.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी Galaxy A55 5G फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनला 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.
  • आणखी फिचर्स : सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स, एनएफसी, ब्लूटूथ 5.3, वाय-फाय 6 आणि आयपी67 रेटिंग सारखे फिचर्स पाहायला मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here