Samsung Galaxy A80 इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट, 15 जूनला होईल लॉन्च

91मोबाईल्सने मागे एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती ज्यात Samsung च्या गॅलेक्सी ए सीरीजच्या सर्वात नवीन आणि स्टाईलिश स्मार्टफोन Galaxy A80 च्या भारतीय किंमतीची माहिती देण्यात आली होती. आम्ही सांगितले होते कि Samsung लवकरच भारतात आपला हा शानदार स्मार्टफोन आणणार आहे जो 15 जूनला देशात लॉन्च होईल आणि दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आज Samsung ने पण Galaxy A80 लॉन्च पण निश्चित केला आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल वेबसाइट द्वारे Galaxy A80 च्या इंडिया लॉन्चची माहिती दिली आहे.

Samsung ने जरी Galaxy A80 च्या लॉन्च डेटची माहिती दिली नसली तरी कपंनीने आपल्या अधिकृत वेबसाइट वर Galaxy A80 चे प्रोडक्ट पेज लाईव केले आहे. या प्रोडक्ट पेज वर Galaxy A80 च्या फुल डिटेल्स सोबत ‘नोटिफाई मी’ ऑप्शन पण आला आहे. जिथे यूजर आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी देऊन स्वतःला Galaxy A80 साठी रजिस्टर करू शकतात. रजिस्टर केल्यानंतर फोनची लॉन्च डेट व इतर माहिती यूजरला सर्वात आधी दिली जाईल. हे पेज लाईव झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy A80 आता लवकरच इंडियन बाजारात येणार आहे.

91मोबाईल्स एक्सक्लूसिव कवरेज
Samsung Galaxy A80 च्या रूपाने कंपनीने जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल असलेला स्मार्टफोन सादर केला होता. कंपनी येत्या 15 जूनला भारतात Galaxy A सीरीजचा हा स्मार्टफोन लॉन्च करेल. Galaxy A80 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. पहिल्या वेरिएंटची किंमत 39,990 रुपये असेल तर दुसरा वेरिएंट 44,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. विशेष म्हणजे लॉन्च डेटच्या आधी Samsung देशात पाच शहरांत Galaxy A80 exclusive preview event चे आयोजन पण करणार आहे.

Galaxy A80 डिजाईन
गॅलेक्सी सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन फक्त सॅमसंगच नाही तर जगातील सर्व स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सर्वात वेगळा आणि अनोखा आहे. फक्त डिजाईनच्या बदलामुळे हा फोन बेस्ट सेल्फी फोन पण बनला आहे. आतापर्यंत पॉप-अप कॅमेरा, स्लाईडर पॅनल आणि शार्क फिन पॉप-अप सारखे सेल्फी कॅमेरा सेटअप बाजारात आले आहेत. पण Galaxy A80 च्या रोटेटिंग कॅमेऱ्यासह सॅमसंग ने नवीन ट्रेंडची सुरवात केली आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण सॅमसंगचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच आहे.

सॅमसंग ने आपला हा नवीन फोन रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर बनवला आहे. फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीची कमांड देताच हाच स्लाईडर पॅनल वर येतो आणि फोन बॉडीच्या बाहेर येतो. पॅनल वर आल्यानंतर संपूर्ण रियर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो तसेच सर्व कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट समोरच्या बाजूला येतात आणि अशाप्रकारे फोनचा रियर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनतो.

Galaxy A80 सॅमसंग ने 3डी ग्लास वर बनवला आहे जो मेटल फ्रेम सह येतो. हा फोन फुलव्यू न्यू इनफिनिटी बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला आहे, ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच देण्यात आलेली नाही. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Galaxy A80 च्या स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या स्लाईडर पॅनल वर कॅमेरा सेटअप आहे तसेच पॅनल वर मध्ये सॅमसंगची ब्रॅण्डिंग आहे. Galaxy A80 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. फोन खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे तसेच याच्या बाजूला स्पीकर आणि सिम ट्रे देण्यात आला आहे.

Galaxy A80 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो कालच कंपनीने आफिशियल केला आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पुन्हा सांगतो, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here