सॅमसंगच चार रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 कंपनीच्या इंडियन आॅफिशियल वेबसाइट वर प्री-रजिस्ट्रेशन साठी लिस्ट झाला आहे. फोन इंडियन वेबसाइट वर लिस्ट होऊन 2 आठवड्यांपेक्षा झाला आहे पण सॅमसंग ने अजून गॅलेक्सी ए9 कोणत्या तारखेला भारतात लॉन्च केला जाईल हे सांगितले नाही. आज मीडिया इन्वाईट पाठवत सॅमसंग इंडिया ने गॅलेक्सी ए9 च्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. सॅमसंग येत्या 20 नोव्हेंबरला आपला हा 4 रियर कॅमेरे वाला फोन भारतात लॉन्च करणार आहे.
सॅमसंग येत्या 20 नोव्हेंबरला राजधानी मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा 4 रियर कॅमेरे असेलला शानदार स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 इंडियन मार्केट मध्ये येईल. तसेच 91मोबाईल्सच्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये आम्ही आधीच खुलासा केला आहे कि गॅलेक्सी ए9 चा एक वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये बाजरात सेल साठी उपलब्ध होईल. पण देशात गॅलेक्सी ए9 चे किती वेरिएंट लॉन्च होतील तसेच हा कधी सेल साठी उपलब्ध होईल हे सांगणे काठीण आहे.
गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहेजो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 3,800 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत क्विक चार्ज 2.0 सपोर्ट आहेजो कमी वेळात फोन चार्ज करू शकतो. फोन मध्ये फेस रिकॉग्निशन सपोर्ट आहेतसेच फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए9 च्या या प्रोडक्ट पेज वरून समजते कि हा लॅमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल.
सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 मध्ये 6जीबी रॅम असल्याचे प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.त्यामुळे फोन चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण मलेशिया मध्ये हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आशा आहे कि सॅमसंग 6जीबी रॅम सोबतच गॅलेक्सी ए9 चा 8जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करेल.















