काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि शाओमी ने आपल्या फोन्सच्य किंमती कमी केली आहेत तसेच नुकतीच कंपनीने नवीन वर्षाच्या निमित्ताने सूट देण्याची घोषणा पण केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा सोशल मीडिया वर शाओमी फोनच्या किंमती वाढल्याच्या बातम्या वायरल होऊ लागल्या. कंपनीने या बातम्यांचे खंडन केले आहे आणि हि वाढ खोटी असल्याचे सांगतिले आहे. याबाबत शाओमी इंडिया चे एमडी आणि ग्लोबल वीपी मनु कुमार जैन यांनी स्वतः सोशल मीडिया वर एक पोस्ट शेयर केली आहे. पोस्ट मध्ये त्यांनी सांगितले आहे कि शाओमी ने कोणत्याही स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या नाहीत.
मनु यांनी आपल्या फेसबुक पेज वर एक ईमेज पोस्ट केली आणि म्हटले आहे “सोशल मीडिया आणि व्हाट्सऍप वरून आम्हाला माहिती मिळाली आहे कि काही लोक शाओमी फोनच्या किंमत वाढीची खोटी बातमी पसरवत आहे. पण कंपनीने कोणत्याही स्मार्टफोनची किंमत वाढवली नाही.” सोबत फोनच्या किंमत वाढीची पोस्ट त्यांनी फेक म्हणून शेयर पण केली आहे.

#FakeNews! Came to know about a FAKE "price hike" msg about Xiaomi phones being floated on social media & WhatsApp (by…
Manu Kumar Jain यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८
नुकतेच शाओमी ने यूजर्सना ‘न्यू ईयर’ भेट देत शाओमी ने एक साथ आपल्या 10 स्मार्टफोन वेरिएंटच्या किंमतवर थेट 2,000 रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. शाओमीची हि खास ऑफर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे उद्या 25 डिसेंबरपासून सुरु केली जाईल जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी पर्यंत चालेल. शाओमीची हि ऑफर ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध असेल.
या ऑफर मध्ये शाओमी मी ए2 च्या 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वाल्या वेरिएंटच्या किंमतीवर 2,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यांनंतर हा वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 14,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला मी ए2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
तसेच शाओमी रेडमी वाय2 तसेच रेडमी नोट 5 प्रो च्या सर्व वेरिएंट्स वर 1,000 रुपयांचीसूट देत आहे. यात 12,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये तसेच 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.














