28 नोव्हेंबरला लॉन्च होईल रियलमी यू1, हा असेल देशातील पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन

91मोबाईल्स ने गेल्या आठवड्यातच एक्सक्लूसिव बातमी दिली होती की स्मार्टफोन ब्रँड रियलमी एक अगदी नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे जी कंपनी ‘यू सीरीज’ नावाने बाजारात आणेल. आम्ही असे पण सांगितले होते कि यू सीरीज अंतर्गत लॉन्च होणार फोन इंडियाचा पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट आधारित फोन असेल. बातमी आल्यानंतर दोन दिवसांनीच रियलमी ने स्वतः आपली ‘यू सीरीज’ समोर आणली आहे. रियलमी ने आॅफिशियल घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 28 नोव्हेंबरला आपली ‘यू सीरीज’ लॉन्च करणार आहे.

रियलमी ने मीडिया इन्वाईट पाठवत आपल्या आगामी स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितली आहे. रियलमी ने सांगितले आहे कि कंपनी 28 नोव्हेंबरला देशात एका ईवेंटचे आयोजन करेल आणि तेव्हाच रियलमी की ‘यू सीरीज’ पहिल्यांदा टेक मंचावर सादर केली जाईल. या सीरीज अंतर्गत लॉन्च होणार पहिला फोन रियलमी यू1 असेल. रियलमीच्या इन्वाईट वरून हे स्पष्ट झाले आहे कि कंपनीच्या ‘यू सीरीज’ मध्ये लॉन्च होणार पहिला फोन अमेझॉन एक्सक्लूसिव होगा. म्हणजे रियलमीचा हा फोन फक्त अमेझॉन इंडिया वरच विकला जाईल.

रियलमी यू1 मध्ये मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट असेल हे कंपनी ने आपल्या मीडिया इन्वाईट मधून कंफर्म केले आहे. तर रियलमीचा हा फोन पण रियलमी 2 प्रो प्रमाणे ‘ओ’ शेप वाल्या ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. रियलमी यू1 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी कंपनी ने सांगितले नाहीत पण आशा आहे कि हा फोन सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन असेल आणि यात पावरफुल फ्रंट कॅमेरा देण्यात येईल.

बोलले जात आहे कि रियलमी यू सीरीजचा हा फोन कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्येच लॉन्च करेल. रियलमी ने याआधी रियलमी 1 आणि रियलमी 2 व तत्यांच्या वेगवेगळ्या वर्जन व्यतिरिक्त फक्त ‘सी सीरीज’ देशात आणली आहे आणि कंपनीच्या सी सीरीज अंर्तगत आतापर्यंत एकच स्मार्टफोन रियलमी सी1 नावाने लॉन्च झाला आहे.

कंपनी द्वारा गेल्या महिन्यात लॉन्च केला गेलेला रियलमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो तर रियलमी सी1 कंपनी ने क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह आणला आहे.आता रियलमी यू सीरीज सह कंपनी मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाल्या फोनची सुरवात करणार आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन 12नॅनोमी​टर टेक्नॉलॉजी वर बनेल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी 28 नोव्हेंबरची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here