6GB रॅम असलेला Samsung Galaxy F41 वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच होईल सादर

अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंग ऑनलाइन यूजर्सना लक्षात ठेऊन भारतात लवकरच Samsung Galaxy F सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे, ज्याची किंमत 15,000 ते 20,000 रुपयांमध्ये असेल. फोनच्या लॉन्चच्या आधी सॅमसंग इंडिया वेबसाइट वर मॉडेल नंबर SM-415F चा सपोर्ट पेज लाइव झाला आहे, जो पाहून बोलले जात आहे कि हा गॅलेक्सी एफ सीरीजचा पहिला फोन असेल. तसेच डिवाइस आता याच मॉडेल नंबर सह गीकबेंच साइट आणि गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट झाला आहे, जिथे फोनच्या नावासह फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

अलीकडेच सांगण्यात आले होते कि हे फोन्स कथितपणे कॅमेरा-सेंट्रिक असतील, जे सुरवातीला फक्त ऑनलाइन मार्केटच्या माध्यमातून उपलब्ध केले जातील पण नंतर हे रीटेल स्टोर्स वर पण उपलब्ध होतील. तसेच एका टिप्सटरने माहिती दिली होती कि गॅलेक्सी एफ-सीरीज मध्ये येणारा फोन गॅलेक्सी एफ 41 असेल. याचाच खुलासा गूगल प्ले कंसोल वर पण झाला आहे.

गूगल प्ले लिस्टिंग बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy F41 मध्ये Exynos 9611 चिपसेट सादर केला जाईल, त्या सोबत ग्राफिक्ससाठी ARM Mali G72 GPU आणि 6GB रॅम असेल. तसेच हँडसेट अँड्रॉइड 10 वर चालेल जो वन UI 2.0 कस्टम स्किन सह येईल. इतकेच नव्हे तर Samsung Galaxy F41 मध्ये FHD+ (1,080 x 2,340p) रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले असेल. तसेच गूगल प्ले कंसोल वर फोनची फ्रंट इमेज पण समोर आली आहे, त्यानुसार डिवाइस वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल.

हे देखील वाचा: 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, हि आहे नवीन किंमत

गीकबेंच लिस्टिंगनुसार स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-F415F सह दिसला आहे. या मॉडेल नंबरला सिंगल-कोर मध्ये 348 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 1339 स्कोर मिळाला आहे. तसेच लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन ऑक्टा-कोर Exynos 9611 चिपसेट आणि 6GB रॅम सह येईल. फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल.

एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि स्मार्टफोन 64-मेगापिक्सलच्या क्वाड-रियर कॅमेरा सेटअप सह कॅमेरा-सेंट्रिक फोनच्या स्वरूपात लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये असा दावा केला गेला आहे कि कंपनी सुरवातीला ऑनलाइन विक्री वर लक्ष केंद्रित करेल, नंतर हा स्मार्टफोन ऑफलाइन सेगमेंट मध्ये येऊ शकतो. टिप्सटर इशान अग्रवालने माहिती दिली होती कि गॅलेक्सी एफ 41 ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन सहित तीन कलर ऑप्शन सह येईल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स

रिपोर्ट मध्ये दावा केला गेला होता कि या गॅलेक्सी एफ सीरीजचा पहिला स्मार्टफोन पुढल्या महिन्यात लॉन्च केला जाईल. त्याचप्रमाणे टिप्सटरने पण माहिती दिली होती कि गॅलेक्सी एफ41 फोन सप्टेंबरच्या शेवटी व ऑक्टोबरच्या सुरवातीला लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here