91mobiles ने टेक विश्वात सर्वप्रथम माहिती दिली होती कि कंपनी Samsung Galaxy F62 वर काम करत आहे, ज्याचा मॉडेल नंबर SM-E625F असेल. तसेच सॅमसंगच्या ग्रेटर नोयडा मधील फॅक्ट्री मध्ये फोनचे प्रोडक्शन पण सुरु झाले आहे. आता आम्हाला या फोनच्या रियर पॅनल आणि सिम ट्रेची ईमेज मिळाली आहेत, ज्यावरून डिजाइनची माहिती मिळाली आहे. समोर आलेल्या फोटोज पैकी एक ईमेज मध्ये SM-E62 मॉडेल नंबर लिहिण्यात आला आहे जो कि सॅमसंग गॅलेक्सी एफ62 असल्याचे बोलले जात आहे. पण आमच्या सोर्सने माहिती दिली आहे कि हा फोन Samsung Galaxy E62 नावाने सादर केला जाईल. जर असे झाले तर कंपनी पुन्हा एकदा मार्केट मध्ये आपल्या Galaxy E सीरीज सह कमबॅक करेल.
फोटोजनुसार Samsung Galaxy F62/E62 चा बॅक ग्लोसी फिनिश आणि चौकोनी आकाराच्या कॅमेरा मॉड्यूल सह येईल. कॅमेरा मॉड्यूल फोनच्या मागे टॉप लेफ्ट कॉनर्र वर असले. तसेच या सेटअप मध्ये ट्रिपल कॅमेरा लेंस असेल. फोटोज मध्ये मागे कोणताही फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही, त्यामुळे आशा व्यक्त केली जात आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले सेंसर असेल. Galaxy F62/E62 च्या लाइव इमेज वरून समोर आले आहे कि फोन SIM कार्डला सपोर्ट सह येईल. तसेच असे वाटत आहे कि फोन polycarbonate चा असेल, ज्याला कंपनीने ‘glasstic’ असे नाव दिले आहे.
Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. तसेच, डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, येत्या काळात फोनची अजून माहिती मिळू शकते.
हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी जाणून घ्या Nokia 5.4 चे फुल स्पेसिफिकेशन्स
Samsung ने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. हि सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर केली गेली आहे जी जगात सर्वात आधी सर्वप्रथम भारतात सादर केली गेली होती. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 होता.