टेक दिग्गज सॅमसंग ने या महिन्यात आपल्या गॅलेक्सी सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे3 (2018) सादर केला आहे. हा स्मार्टफोन यूएस मार्केट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच आता आपल्या स्मार्टफोन सीरीज मध्ये नवीन बदल करत सॅमसंग ने याच स्मार्टफोन चा अजून एक नवीन वर्जन गॅलेक्सी जे3 स्टार पण सादर केला आहे. सॅमसंग ने हा फोन सध्या यूएस मार्केट मध्ये सादर केला आहे तिथे याची किंमत 175 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 12,000 रुपये असेल.
सॅमसंग गॅलेक्सी जे3 स्टार ची सर्वात खास बाब ही आहे की हा पहिला स्मार्टफोन आहे जो ‘स्टार’ टाईटल सह सादर झाला आहे. विशेष म्हणजे सॅमसंग आता पर्यंत सर्व डिवाईस चे वर्जन प्रो, प्राईम, मॅक्स अशा किंवा नेक्स्ट टाईटल सह सादर करत असते पण ‘स्टार’ टाईटल सॅमसंग ने पहिल्यांदा सादर केला आहे. मजबूत कनेक्टिविटी साठी कंपनी ने यात एलटीई बँड 71 दिला आहे. या बँड मुळे इंटरनेट व नेटवर्क कनेक्टिविटी 4 पट फास्ट आणि चांगली होते.
गॅलेक्सी जे3 स्टार चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच 1.4गीगाहर्ट्ज कॉडकोर प्रोसेसर सह सॅमसंग च्या एक्सनॉस 7570 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी जे3 स्टार च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-टी720 जीपीयू आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 2,600एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ग्लोबल मार्केट सह भारतात कधी येईल याची वाट बघावी लागेल.















